Samana Editorial | गुजरातमधून 40 हजार मुली कुठे गायब झाल्या? सामना अग्रलेखाच्या माध्यमातून भाजपाला खडा सवाल

Samana Editorial | मुंबई: ‘द केरला स्टोरी’ (The Kerala Story) या चित्रपटावरून देशात वादविवाद सुरू आहे. पश्चिम बंगाल आणि तमिळनाडू या राज्यांमध्ये या चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे. भाजपकडून हा प्रपोगंडा सुरू असल्याचा आरोप अनेकांकडून करण्यात येत आहे. अशात मागच्या पाच वर्षात गुजरातमधून तब्बल 40 हजार मुली बेपत्ता झाल्याची अधिकृत माहिती मिळाली आहे. या सर्व प्रकरणाला जबाबदार कोण? असा सवाल सामना अग्रलेखातून करण्यात आला आहे.

मुस्लिम तरुण हिंदू मुलींना लव जिहादच्या जाळ्यात अडकवून त्यांचं धर्मांतर करतात आणि त्यांना अफगाणिस्तान, इराण, सिरिया या देशांमध्ये घेऊन जातात, असा उल्लेख या चित्रपटामध्ये करण्यात आला आहे. मात्र, गुजरातमधून बेपत्ता झालेल्या मुलींचं काय? त्यांना न्याय कोण देणार? त्यांचा शोध कोण घेणार? असे प्रश्न सामना अग्रलेखातून उपस्थित करण्यात आले आहे.

“गुजरातमध्ये कायद्याचे राज्य अस्तित्वात असेल, तर या मुलींना न्याय मिळेल. नाहीतर मन की बाता-बाते करून लोकांना गुमराह केले जाऊ शकते. या मुलींची चिंता पंतप्रधान आणि गृहमंत्रालयाला नसेल, तर त्यांना कोणत्याच प्रश्नाचं गांभीर्य नाही, असा याचा अर्थ होतो”, अशा शब्दांत सामना अग्रलेखात याबाबत मांडणी करण्यात आली आहे.

“पंतप्रधान मोदींनी ‘कश्मीर फाइल्स’ आणि ‘केरळा स्टोरी’ला पाठिंबा दिला आहे. त्याचप्रमाणे ते गुजरातमधील 40 हजार मुलींच्या स्टोरीला पाठिंबा देऊन पडद्यावर आणतील का? आज आंतरराष्ट्रीय महिला खेळाडू याबद्दल आंदोलन करत आहे, पण त्यावर कोणीच बोलायला तयार नाही”, असं देखील सामना अग्रलेखात म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या

You might also like

Comments are closed.