Samana Editorial | “मुख्यमंत्री शिंदे वाऱ्यावर तर गृहमंत्री फडणवीस…”; सामना अग्रलेखातून भाजपवर टीकास्त्र

Samana Editorial | मुंबई: कर्नाटक विधानसभा निवडणूक निकालानंतर महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज्यातील सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने शिंदे-फडणवीस सरकार सोबतच मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्रामध्ये मिंधे सरकार आल्यापासून दंगलीचे प्रमाण वाढत चालले आहे, असा गंभीर आरोप सामना अग्रलेखाच्या माध्यमातून करण्यात आला आहे.

ठाकरे गटाने शिंदे फडणवीस सरकारवर सामना अग्रलेखाच्या माध्यमातून पुन्हा एकदा टीकास्त्र चालवलं आहे. “राज्यामध्ये मिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून धर्मीय आणि जातीय दंगलींचे प्रमाण वाढत चालले आहे. मुख्यमंत्री शिंदे वाऱ्यावर आहेत तर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस फक्त नावालाच आहे. दंगली घडवून आणायच्या आणि राजकीय भाकरी शेकायच्या हा भाजपचा धंदा आहे. निवडणुका जवळ आल्या की भाजप आपला हा धंदा वेगाने सुरू करतो. त्यामुळे आता आम्हाला महाराष्ट्राच्या भविष्याची चिंता वाटत आहे,” असं म्हणतं सामना अग्रलेखाच्या माध्यमातून ठाकरे गटाने भाजपवर टीकास्त्र चालवलं आहे.

“राज्यामध्ये सुरू असलेल्या दंगली राजकीय हेतूने प्रेरित आहे. त्याचबरोबर त्या जाणीवपूर्वक घडवून आणल्या जात आहे. तर काही लोक या आगीत तेल ओतण्याचे काम करत आहे आणि त्यांचे चेहरे आम्ही लवकरच बाहेर आणणार आहोत. भाजप दंगली घडवून आणणारा कारखाना आहे”, असा आरोप सामना अग्रलेखच्या माध्यमातून भाजपवर करण्यात आला आहे.

“भाजपने शिवसेना फोडून राज्य केले आहे. तर त्यांना आता समाज फोडून निवडणुका लढायच्या आहे. भारतीय संविधान, धार्मिक सलोखा, राष्ट्रीय एकात्मता हे सगळं विसरून सत्ता गाजवणारे सभोवती वावरत आहे”, असं देखील सामना अग्रलेखात नमूद करण्यात आलं आहे.

महत्वाच्या बातम्या

You might also like