Samantha Ruth Prabhu | समंथा प्रभू रुग्णालयात दाखल, चाहत्यांची वाढली चिंता

टीम महाराष्ट्र देशा: पुष्पा (Pushpa) या चित्रपटातून ‘ऊ अंटवा’ या गाण्यामुळे चर्चेत आलेल्या समंथा प्रभू (Samantha Ruth Prabhu) च्या चाहत्यांसाठी काळजी वाढवणारी एक बातमी आहे. समंथाने तिच्या सोशल मीडियावर एक रुग्णालयातील फोटो शेअर केला आहे. ती मायोसिटीस (Myositis) या दुर्मिळ आजाराला झुंज देत आहे. त्या आजारातून बरं होण्यासाठी तिला अधिक वेळ लागत आहे, असं तिनं तिच्या सोशल मीडियावरून सांगितले आहे.

मायोसिटीस हा एक दुर्मिळ आजार आहे. या आजारामध्ये शरीरातील मास पेशींमध्ये दम लागणे, वेदना होणे, श्वसनक्रियेमध्ये अडचणी येणे ही प्रमुख लक्षणे आहे. तज्ञांच्या म्हणण्यानुसार, व्हायरल, सर्दी, फ्लू इत्यादी आजारांच्या ऑटोइम्युन कंडिशनमुळे मायोसिटीस होतो. मायोसिटीस या आजारामध्ये दोन प्रकार असतात. यामध्ये पॉलिमायोटिस (polymyositis) आणि डर्माटोमायोसिटिस (dermatomyositis) यांचा समावेश होतो.

तज्ञांच्या म्हणण्यानुसार, मायोसिटीस या आजारावर अद्याप कुठलाही ठोस उपाय नाही. अशा परिस्थितीत व्यायाम, योग, नियमित तपासणी, नियमित औषधे घेऊन हा आजार बरा केला जाऊ शकतो. त्याचबरोबर या आजारावर वेळीच उपचार सुरू झाल्यास याची तीव्रता कमी होऊ शकते. मायोसिटीस पुरुषांच्या तुलनेमध्ये स्त्रियांना जास्त होण्याची शक्यता असते असेही म्हटले जाते.

अभिनेत्री समंथा प्रभू हिने ‘ओ बेबी’, ‘सुपर डीलक्स’ आणि वेब शो ‘द फॅमिली मॅन 2’ यामध्ये अप्रतिम भूमिका साकारल्या आहेत. त्याचबरोबर समंथा वैयक्तिक पातळीवर एक स्वतंत्र आणि आत्मविश्वासू महिला आहे. समंथाचा ‘यशोदा’ हा नुकताच प्रदर्शित झालेला चित्रपट तिचा पहिला पॅन इंडिया चित्रपट आहे. हा चित्रपट तब्बल पाच भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. यामध्ये तमिळ, मल्याळम, हिंदी, तेलगू, कन्नड या भाषांचा समावेश आहे.

महत्वाच्या बातम्या 

 

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.