शाहरुख खानसोबत काम करण्यास समांथाचा स्पष्ट नकार?

मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मोठा मुलगा आर्यन खानला क्रूझ ड्रग्ज प्रकरणी अटक करण्यात आली आहे. या दरम्यान शाहरुखसाठी आणखी एक वाईट बातमी समोर येत आहे. दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभू हिने शाहरुखसोबतच्या एका चित्रपटाला नकार दिला आहे. त्यामुळे त्याच्यासह चाहत्यांनाही धक्का बसला आहे.

दाक्षिणात्य दिग्दर्शक एटली यांच्या आगामी ‘लायन’ चित्रपटाची सध्या सिनेसृष्टीत बरीच चर्चा आहे. या चित्रपटासाठी अभिनेत्री समांथा रुथ प्रभू हिला विचारण्यात आले होते. मात्र समांथाने शाहरुखसोबत काम करण्यास स्पष्ट नकार दिला आहे. समांथाकडे अनेक चित्रपट आहे. ती त्याच्या चित्रीकरणामध्ये व्यस्त आहे. त्यामुळेच तिने शाहरुखसोबत ‘लायन’ चित्रपट करण्यास नकार दिला आहे. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

दरम्यान लवकरच समांथा तिच्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करणार आहे. ड्रिम वॉरियर पिक्चर या प्रोडक्शन हाऊसने ट्विटरवर एक पोस्ट शेअर करत ही घोषणा केली आहे. तेलुगू आणि तमिळ भाषेत हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

महत्वाच्या बातम्या

 

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा