Sambhaji Bhide । संभाजी भिडेंविरोधात पुण्यात काँग्रेसचं जोरदार आंदोलन; म्हणाले, “तुम्ही कोणत्या ब्रँडचं धोतर…”

Sambhaji Bhide । पुणे :  शिवप्रतिष्ठान संघटनेचे अध्यक्ष संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी एक विधान केलं आहे. एका महिला पत्रकाराने त्यांच्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, ‘आधी कुंकू लाव मगच तुझ्याशी बोलतो,’ असं म्हणत संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी महिला पत्रकाराला बोलण्यास नकार दिला. यावरून राजकीय वर्तुळात त्याविषयी चर्चा केल्या जात आहे. याच पार्श्वभूमीवर पुण्यात संभाजी भिडेंविरोधात काँग्रेस महिला आघाडीकडून आंदोलन करण्यात आलं.

पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर चौकात काँग्रेस पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांकडून टिकली न लावता हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी संभाजी भिडेंच्या फोटोला महिलांनी टिकली लावून निषेध नोंदविला. महाराष्ट्र काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षा, माजी नगरसेविका संगीता तिवारी (Sangita Tiwari) यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी बोलताना त्यांनी संभाजी भिडेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

त्या म्हणाल्या, “आम्हाला शिकवणारे तुम्ही कोण? संविधानाने आम्हाला कसं राहायचं, काय घालायचं याचा हक्क दिला आहे. उद्या तुम्ही जीन्स, टी-शर्ट घालू नका, डोक्यावर पगर घ्या असं सांगाल. हा काय तालिबान आहे का? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. हा भारत देश असून शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचाराने चालतो. बायकांनी कुंकू लावायचं की नाही हे ठरवणारे तुम्ही कोण?,” अशी विचारणा करत संगीता तिवारी संभाजी भिडेंच्या वक्तव्याचा निषेध केलाय.

पुढे त्या म्हणाल्या, “तुम्ही भारतामाता धर्मांध केली आहे, आमची भारतमाता सर्वांना सामावून घेणार नाही. तुमच्यासारख्या माथेफिरु, धर्मवेड्यांनी भारतमातेचं नाव खराब केलं आहे. आम्ही मात्र ते होऊ देणार नाही. आम्ही तुम्हाला कोणत्या ब्रँडचं धोतर घालावं सांगितलेलं नाही,” असं म्हणत त्यांनी भिडेंना टोला लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.