Sambhaji Brigade | संभाजी बिग्रेडचा मोठा इशारा; “हर हर महादेव चित्रपट दाखवणं थांबवा, नाहीतर…”

Sambhaji Brigade | मुंबई : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे पराक्रमी मावळे नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांच्यावर आधारित ‘हर हर महादेव’ (Har Har Mahadev) हा चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झाला आहे. तसेच, ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ (Vedat Marathe Veer Daudle Saat) हा सुद्धा चित्रपट आगामी काळात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटांमधून इतिहासाची मोडतोड होत असल्याचा दावा संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनी केलाय. अशातच आता ‘संभाजी ब्रिगेड’ने देखील याबाबत आक्रमक भूमिका घेतलेली पाहायला मिळत आहे.

संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. “हर हर महादेव चित्रपट दाखवणे थांबवा. चित्रपटगृहात पडदे फाटल्याशिवाय थेटर मालकांना अक्कल येणार नाही. आमच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज सर्वोच्च आहेत. इतिहासाची मोडतोड करून ‘हर हर महादेव’ चित्रपट तयार केलाय”, असा दावा संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी केला.

ते म्हणाले, ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ हा सुद्धा चित्रपट शेंबडी आणि फॉल्टी पोरांना घेऊन तयार करण्यात आलेला आहे. अकराळ विक्राळा मावळे दाखवण्याचा प्रयत्न होत आहे. इतिहासातील हरामखोरी थांबवा”, असा हल्लाबोल संतोष शिंदेंनी केला. तसेच सरकारने या चित्रपटावर बंदी घालावी”, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली.

त्याचबरोबर “सुबोध भावे, अभिजीत देशपांडे, अक्षय कुमार किंवा महेश मांजरेकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा कर्तुत्वान इतिहास बदनाम करू नका. गाठ संभाजी ब्रिगेडशी आहे. चित्रपटगृहाचे पडदे फाडल्याशिवाय तुम्हाला अक्कल येणार नाही, असा इशारा संतोष शिंदे यांनी दिला.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.