InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

पर्वती’सह पुण्यातील सर्व जागा लढवणार- संभाजी ब्रिगेड

- Advertisement -

‘वन बुथ थर्टी युथ’ हा संभाजी ब्रिगेड चा फॉर्म्युला घेऊन संभाजी ब्रिगेड पर्वतीसह पुण्यातील सर्व  विधानसभेच्या जागा लढवणार असल्याचा निर्णय संभाजी ब्रिगडेच्या बैठकीत ठरला आहे.

- Advertisement -

विधानसभेची निवडणूक संभाजी ब्रिगेड स्वबळावर लढणार आहे. तसेच समविचारी पक्ष संघटना व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन ब्रिगेड विधानसभेसाठी तयार झाली आहे, आमची लढाई प्रस्थापितांना सोबत व जातीयवाद्यांशी असल्याने समाजकारण व राजकारणातील ‘पोकळी’ संभाजी ब्रिगेड भरून काढू शकते, हा ठाम विश्वास प्रत्येक कार्यकर्त्याला असला पाहिजे… असे मत संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष अॕड. मनोज आखरे यांनी व्यक्त केले.

सदर बैठकीला संभाजी ब्रिगेड पुणे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे, शहराध्यक्ष प्रशांत धुमाळ, प्रकाश धिंडले, सुभाष जाधव, पंढरीनाथ सोंडकर, चंद्रशेखर घाडगे, सनी थोपटे, शिवाजी पवार, महादेव मातेरे, विवेक तुपे, अजय पवार, जोतिबा नरवाडे, रमाकांत सुतार, प्रितम घाटे, रमेश परळीकर, नितीन शिंदे, संतोष मुळे, पांढुरंग पाटील, प्रकाश पारखे, प्रशांत चव्हाण, दत्ता इंगळे, महेश अंबड, मारूती चव्हाण, तस्मिन चाऊस, उमेश देवगिरिकर, सचिन अवघडे, बापू पवार, विकि मस्के, नयन ओहाळ, रंजीत दामगुडे, सुनिल साळूंखे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

Comments are closed.