Sambhaji Chhatrapati | “आव्हाडांना याचे परिणाम भोगावे लागतील”; संभाजी राजे जितेंद्र आव्हाडांवर आक्रमक
Sambhaji Chhatrapati | मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Ahwad) नी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. विरोधकांकडून त्यांच्या या वक्तव्यावर सडकून टीका करण्यात आली आहे. त्याचबरोबर आव्हाडांविरोधात अनेक आंदोलन करण्यात आली आहे. भाजपने ही आव्हाडांविरोधात आक्रमक भूमिका मांडली आहे. याबाबत स्वराज्य संघटनेचे प्रमुख संभाजी राजे छत्रपती यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
संभाजी छत्रपतींचं ट्वीट (Sambhaji Chhatrapati’s Tweet)
जितेंद्र आव्हाडांना त्यांच्या या वक्तव्याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा संभाजी राजे यांनी ट्विट करत दिला आहे. “जितेंद्र आव्हाड एका विशिष्ट कंपूत वाढलेले आहेत. महाराष्ट्र त्यांना गांभीर्याने घेत नाही आणि घेणारही नाही. मतांसाठी, चर्चेत राहण्यासाठी बेताल वक्तव्य करणे बरे नव्हे. याचे परिणाम भोगावे लागतील”, असे संभाजी राजे ट्विट करत म्हणाले आहेत.
जितेंद्र आव्हाड एका विशिष्ट कंपूत वाढलेले आहेत. महाराष्ट्र त्यांना गांभीर्याने घेत नाही आणि घेणारही नाही. मतांसाठी, चर्चेत राहण्यासाठी बेताल वक्तव्य करणे बरे नव्हे. याचे परिणाम भोगावे लागतील.
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) February 7, 2023
आव्हाडांचं वादग्रस्त वक्तव्य (Jitendra Ahwad’s Controversial Statement)
पुण्यात बोलत असताना जितेंद्र आव्हाड यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. विरोधकांकडून त्यांच्या या वक्तव्यावर चांगलीच टीका केली जात आहे. “एमपीएसीमधूम महाराष्ट्राचा इतिहास हा विषयच गायब करून टाकला. एके दिवशी तावडे विधानसभेत म्हणाले की आम्ही पुस्तकातून मुघलांचा इतिहास काढून टाकणार. मग मी म्हणालो की मग शिवाजी महाराज गोट्या खेळत होते, असे दाखवणार का? समोर औरंगजेब ठेवला म्हणून शिवाजी महाराज आहेत. अफजलखान आहे म्हणून शिवाजी महाराज आहेत ना. शाहिस्तेखान आहे म्हणून शिवाजी महाराज आहेत ना. यातूनच शिवाजी महाराज राज्यकारभार कसा चालवतात हे जगासमोर आहे ना. 1669 साली दुष्काळ होता. तेव्हा आपल्या तिजोरीचे टाळे उघडून शेतकऱ्यांमध्ये पैसे जाऊद्या, हे सांगणारे जगातील पहिले राजे शिवाजी महाराज होते,” असे जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- Ravikant Tupkar – आत्मदहन करु द्या, अन्यथा गोळ्या घाला; सोयाबीन – कापसाच्या प्रश्नावर रविकांत तुपकर आक्रमक
- #Big_Breaking | “सत्यजीत तांबेंना ऑफर नाही, थोरातांना आमंत्रण”; भाजप प्रदेशाध्यांचं मोठं वक्तव्य
- Job Opportunity | भारतीय पोस्ट विभागात बंपर भरती! ‘या’ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू
- Skin Care With Ice | बर्फाच्या मदतीने चेहऱ्यावरील ‘या’ समस्या सहज होतात दूर
- Nana Patole | “माझ्याकडे या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्यायला वेळ नाही”; थोरातांच्या राजीनामा प्रकरणी नाना पटोलेंचं वक्तव्य
Comments are closed.