InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

मराठा विद्यार्थ्यांचा प्रश्न युद्ध पातळीवर सोडविण्याचा प्रयत्न करू – खा. संभाजी राजे

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे मराठा विद्यार्थ्यांसाठी वैद्यकीय  पदव्युत्तर अभ्यासक्रमामध्ये राखीव २१३ जागांवरील प्रवेशही रद्द झाल्यामुळे नाराज मराठा विद्यार्थ्यांनी गेल्या ९ दिवसांपासून आझाद मैदान येथे आंदोलनास बसले आहेत.

या विद्यार्थ्यांची आज (१५ मे) भाजपचे खासदार संभाजी महाराज यांनी भेट घेतली असून विद्यार्थ्यांचे मागण्या ऐकून घेतल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या अधिकारात लवकरात लवकर अध्यादेश काढावा व या विध्यार्थ्यांना न्याय द्यावा, संभाजी महाराज म्हणाले.

विद्यार्थ्यांच्या मागण्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा करून यावर तोडगा काढण्याचे आश्वासन महाराजांनी विद्यार्थ्यांना दिले आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply