Sambhajiraje Bhosale | “…तर उठाव होणारच”, संभाजीराजे भोसले कडाडले

Sambhajiraje Bhosale | मुंबई : काही दिवसांपूर्वी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी बोलताना आक्षेपार्ह विधान केले होते. असे असतानाच काँग्रेसने कोश्यारी यांचा नवा व्हिडीओ अपलोड करून २६/११च्या मुंबई हल्ल्यामधील हुतात्म्यांचा अपमान केल्याचा दावा केला आहे. त्यामुळे वातावरण जास्त तापत असून यावर भाजप (BJP) नेते संभाजीराजे भोसले (Sambhajiraje Bhosale) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

याबाबत संभाजीराजे भोसले यांनी ट्विट केलं आहे. भगतसिंग कोश्यारी यांच्यावर अजूनही कोणती कारवाई झालेली नाही. कारवाई होत नाही याचा अर्थ त्यांनी केलेल्या विधानांशी राज्यकर्ते सहमत आहेत का ? महाराष्ट्राच्या जनतेला कुणीही गृहीत धरू नये. शिवभक्तांच्या भावना सरकारला समजत नसतील तर उठाव होणारच !, असं त्यांनी म्हटलं आहे.

२६/११ च्या मुंबई हल्ल्यातील हुतात्म्यांना राज्यपाल, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह इतर मान्यवरांनी २६ नोव्हेंबर रोजी अभिवादन केले. या अभिवादनादरम्यानचा व्हिडीओ काँग्रेसने ट्वीट केला आहे. राज्यपाल कोश्यारी यांनी हुताम्यांचा अपमान केला आहे, असा दावा काँग्रेसने केला आहे.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.