Sambhajiraje Chhatrapati | “…तर निर्मात्यांनो गाठ माझ्याशी आहे”; संभाजीराजेंचा मांजरेकरांना इशारा

Sambhajiraje Chhatrapati | पुणे : महाराष्ट्रात एखादा चित्रपट प्रदर्शित झालाय आणि त्यावर वाद झाला नाही असं क्वचितच घडतं. विशेषतः इतिहासावर आधारित चित्रपट नेहमीच वादाच्या भोवऱ्यात सापडतात. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे पराक्रमी मावळे नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांच्यावर आधारित ‘हर हर महादेव’ (Har Har Mahadev) हा चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झाला आहे. तसेच, ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ (Vedat Marathe Veer Daudle Saat) हा सुद्धा चित्रपट आगामी काळात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटांमधून इतिहासाची मोडतोड होत असल्याचा दावा संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनी केलाय.

इतिहासाची मोडतोड करून चित्रपट दाखवले जात असतील, तर आम्ही खपवून घेणार नाही, असा थेट इशारा संभाजी छत्रपती यांनी दिला आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. त्याबरोबरच या चित्रपटांतील मावळ्यांची वेशभूषादेखील ऐतिहासिक संदर्भांना धरून नाही, असा दावा संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनी केला आहे.

महेश मांजरेकर (Mahesh manjarekar) दिग्दर्शित ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ हा चित्रपट आगामी काळात प्रदर्शित होणार आहे. यात मावळ्यांच्या भूमिका साकारत असलेल्या कलाकाराच्या पोशाखावर संभाजीराजेंनी आक्षेप घेतला आहे. “इतिहासाचा गाभा धरून राहावा ना. यातील काही मावळ्यांनी पगडी घातली नसून, तो शोक संदेश आहे. जर, यापुढे प्रोड्यूसर आणि दिग्दर्शकांनी असेच चित्रपट काढले तर, गाठ संभाजी छत्रपतीशी आहे,” थेट इशारा त्यांनी मांजरेकर यांना दिला आहे.

ते म्हणाले, “मी शिवाजी महाराज, शाहू महाराज यांच्या घराण्याची भूमिका स्पष्टपणे मांडली आहे. यात एकही टक्का बदल होणार नाही”. उद्या परत असा चित्रपट काढला, तर मी आडवा येईल. त्यावेळी आणखी कोण आडवं येतं ते बघू, असं आव्हान त्यांनी यावेळी बोलताना केलंय.

“इतिहास कुठे घेऊन जायचा, इतिहासाचा गाभा सोडून लोक जातायेत. तुम्ही चित्रपट काढता चांगली गोष्ट आहे. पण लोकांना आवडतंय म्हणून विपर्यास करून चित्रपट पुढे आणायचे. छत्रपती शिवाजी महाराज की जय, हर हर महादेव म्हणतात आणि आपण इतिहासाचा विपर्यास करायचा?”, असा सवाल संभाजीराजेंनी उपस्थित केलाय.

“सिनेमॅटीक लिबर्टी, स्वातंत्र्य आहे म्हणून आपण काहीही करायचं? अहो भालजी पेंढारकरांचा आदर्श घ्या. आमची सुद्धा चूक आहे. आपल्या लोकांची देखील चूक आहे. आपण शिवाजी महाराजांची पुस्तकं वाचत नाहीयत. वा.सी.बेंद्रे, मेंधळे, जयसिंगराव पवार सर असतील, या लोकांनी इतिहास लिहिताना आयुष्य घालवलं. लोकांना नाट्यरुपांतर आवडतं म्हणून त्यामध्ये काहीही बदल करायचा?”, असा सवाल त्यांनी केला.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.