Sambhajiraje Chhatrapati | “फडणवीसांकडून त्रिवेदींच्या विधानाची पाठराखण का?”; संभाजीराजेंचा संतप्त सवाल

Sambhajiraje Chhatrapati | मुंबई : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) आणि भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी (Sudhanshu Trivedi) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर (Chhatrapati Shivaji Maharaj) केलेल्या वक्तव्यामुळे भाजप बॅकफूटवर आली आहे. या दोघांच्या वक्तव्यावर भाजपचे बहुतांश नेते मौन बाळगून आहेत. या मुद्द्यावर विरोधी पक्षनेते चांगलेच आक्रमक असताना दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी या दोघांचीही पाठराखण केली आहे. यावरून आता संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

संभाजीराजे म्हणाले, “देवेंद्र फडणवीस हे सुधांशू त्रिवेदींच्या वक्तव्याची पाठराखण का करत आहे? हे मला कळलं नाही. सुधांशू त्रिवेदींनी महाराष्ट्राची माफी मागायला पाहिजे. किंबहूना सर्वच शिवप्रेमींची माफी मागायला पाहिजे.” त्याचबरोबर फडणवीसांनी त्यांचे समर्थन करण्यापेक्षा ते माफी कशी मागतील, याकडे लक्ष द्यायला पाहिजे”, अशी संतप्त प्रतिक्रिया संभाजीराजे छत्रपती यांनी दिली आहे.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

सुधांशू त्रिवेदींच्या वक्तव्यावर भाष्य करताना फडणवीस म्हणाले की, “मी त्रिवेदी यांचे वक्तव्य नीट ऐकले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाची माफी मागितली आहे, त्यावर ते काहीही बोलले नाहीत.”

काय म्हणालेत सुधांशु त्रिवेदी?

“सावकरांनी ब्रिटीशांची माफी मागितली होती, असं सांगण्याचा प्रयत्न राहुल गांधींनी केला. त्या काळात अनेक लोकं प्रस्तावित फॉरमॅटमधून (Prescribed Format) बाहेर निघण्यासाठी माफी मागायचे. छत्रपती शिवाजी महाराजांनीदेखील पाचवेळा औरंगजेबाला पत्र लिहिलं होतं. मग याचा अर्थ काय झाला? पण सावकरांनी ब्रिटीश संविधानाची शपथ तरी घेतली नव्हती” असं वक्तव्य त्रिवेदी यांनी केलंय.
महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.