Sameer Wankhede | “मला ही सुरक्षा द्या नाहीतर…”; समीर वानखेडेंनी केली भीती व्यक्त
Sameer Wankhede | मुंबई : एनसीबीचे (NCB) माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांची गेल्या दोन दिवसांपूर्वी सीबीआय (CBI) चौकशी सुरू आहे. परवा ( 20 मे) पाच तास चौकशी करण्यात आली तर काल (21 मे) देखील पाच तास चौकशी करण्यात आली. आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात (Aryan Khan Drug Case) 25 कोटींची खंडणी मगितल्याचा त्यांच्यावर आरोप असल्याने त्याची चौकशी करण्यात येत आहे. तर आता समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांनी माध्यमांशी संवाद साधत असताना माझ्यावर हल्ला होऊ शकतो अशी भीती व्यक्त केली आहे.
सुरक्षेबाबत काय म्हणाले समीर वानखेडे
तसचं सीबीआयच्या (CBI) 2 दिवसांच्या तपासानंतर समीर वानखेडे (Sameer Wankhede ) यांच्या याचिकेवर आज ( 22 मे) न्यायालयात सुनावणी होणार आहे. याबाबत बोलताना त्यांनी म्हटलं की, सीबीआयला त्यांची बाजू मांडू द्या जे काही सत्य आहे ते मी मांडणार आहे. त्यांना त्याचा पक्ष ठेवू द्या माझ्या सीबीआयला (CBI) शुभेच्छा आहेत. मला न्यायालयावर पूर्ण विश्वास आहे असं समीर वानखेडे ( Sameer Wankhede ) म्हणाले. याचप्रमाणे मुंबई पोलीस आयुक्तांकडे विशेष सुरक्षेची मागणी देखील करणार असल्याचं त्यांनी म्हटलं.
What did Sameer Wankhede say about security?
दरम्यान, तुमच्यावर जे काही आरोप होत आहेत यामुळे हल्ल्याची भीती आहे का? असा प्रश्न विचारला तेव्हा समीर वानखेडे यांनी सांगितलं की, सोशल मीडिया, इन्स्टाग्राम, ट्विटर या सोशल मीडियावरुन सतत धमक्या येत आहेत. या सर्व विषयांवर मी मुंबई पोलीस आयुक्तांशी लवकरच चर्चा करणार आहे. मला ही सुरक्षा द्या अन्यथा माझ्यावर अतिक अहमदप्रमाणे हल्ला करू शकतात. अशी भीती देखील समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांनी व्यक्त केली आहे.
महत्वाच्या बातम्या-
- BJP | “पक्षांतर्गत गटबाजीला वैतागलो म्हणून…”; भाजपच्या माजी शहराध्यक्षांचा गौप्यस्फोट
- Amol Mitkari | “पक्षातील वाचाळवीरांना आवर घाला नाहीतर…”; अमोल मिटकरींचा उद्धव ठाकरेंना इशारा
- Uddhav Thackeray | “मोदींना लहर आली म्हणून दोन हजार रुपयाची नोट..”; ठाकरे गटाचं मोदींवर टीकास्त्र
- Nana Patole | “राहुल गांधींना देशाचं पंतप्रधान…’; नाना पटोलेंच्या वक्तव्यानंतर चर्चांना उधाण
- Aditya Thackeray | नागपूरमध्ये झळकले भावी मुख्यमंत्री म्हणून आदित्य ठाकरेंचे पोस्टर, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
- Weather Update | राज्यात पुन्हा एकदा अवकाळी संकट! ‘या’ ठिकाणी पावसाची शक्यता
Original NEWS SOURCE – https://bit.ly/3q2QQZr
Comments are closed.