Sameer Wankhede | …म्हणून समीर वानखेडे यांना मुंबई हायकोर्टाने चांगलंच फटकारल

Sameer Wankhede | मुंबई : आज (22 मे) NCB चे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्या विरोधात सीबीआयने (CBI) केलेल्या आरोपाबाबत मुंबई हायकोर्टामध्ये ( Mumbai High Court) सुनावणी पार पडली. सीबीआय (CBI) आणि समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्या वकिलांकडून युक्तिवाद झाला. यामध्ये समीर वानखेडे आणि अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) यांच्यातील व्हॉट्सअॅप चॅट लीक झाल्यामुळे हायकोर्टाने वानखेडेंना (Sameer Wankhede) चांगलंच फटकारल आहे.

why Sameer Wankhede leak chat with shah rukh khan

तसचं हे प्रकरण कोर्टात प्रलंबित असताना अशा प्रकारे चॅट मीडियावर लीक करण्यास तुम्ही जबाबदार आहात का? असा प्रश्न कोर्टाने समीर वानखेडेंना (Sameer Wankhede) विचारत. यावर वानखेडे यांच्या वकिलांनी या प्रकरणात तपासाच्या बहाण्याने प्रामाणिक अधिकाऱ्याचा छळ केला जात असल्याचं म्हटलं. तर दुसऱ्या बाजूला सीबीआय ( CBI) ने समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर आरोप करत म्हटलं की, चौकशी दरम्यान वानखेडे या प्रकरणाबाबत आम्हाला सहकार्य करत नाहीत. तसचं शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि त्यांचे चॅट त्यांनीच मीडियाला लीक केले असल्याचा आरोप देखील सीबीआय (CBI) समीर वानखेडेवर (Sameer Wankhede) कोर्टात केला आहे.

Sameer Wankhede can tamper with evidence

दरम्यान, सीबीआयने (CBI) पुढे कोर्टाकडून अशी मागणी केली की, समीर वानखेडे (Sameer Wankhede) पुराव्यांसोबत छेडछाड करू शकतात यामुळे त्यांना अटकेविरोधात कोर्टाने कोणताही दिलासा देऊ नये. तर सीबीआय (CBI) च्या या मागणीसाठी वानखेडे यांच्या वकिलानी कोर्टाकडून दोन आठवड्यांचा कालावधी सीबीआयला (CBI) पुरावे देण्यासाठी मागितला आहे. त्यानंतर सीबीआय आणि समीर वानखेडेच्या (Sameer Wankhede) वकिलांनी केलेल्या युक्तिवादांनंतर मुंबई हायकोर्टाने 8 जूनपर्यंत समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांना दिलासा दिला आहे. तसचं जोपर्यंत हे प्रकरण कोर्टात आहे तोपर्यंत या प्रकरणाबाबत मीडियाशी बोलणार नाही, सीबीआयच्या चौकशी प्रतिक्रियाला हजर राहणे आणि पुराव्याशी छेडछाड करणार नाही. असे हमीपत्र द्यावे असं कोर्टाने सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

Original NEWS SOURCE – https://bit.ly/3Oy7XfM