Sameer Wankhede | समीर वानखेडे यांच्या अडचणीत वाढ; 5 तास सीबीआयच्या चौकशीनंतर होऊ शकते निलंबन

Sameer Wankhede | मुंबई : सध्या सीबीआयच्या रडारवर असणारे एनसीबीचे (NCB) माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या अडचणीत वाढ झाली असल्याचं पाहायला मिळतं आहे. आर्यन खान ड्रग्स प्रकरणी (Aryan Khan Drug Case) समीर वानखेडेंनी शाहरुख खानकडे (Shah Rukh Khan) 25 कोटींची खंडणी मगितल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. याबाबत सीबीआयने गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांच्या घरावर देखील छापा टाकला होता. त्यानंतर चौकशीसाठी समन्स देखील बजावण्यात आले होतं. तर काल (19 मे) वानखेडे यांना मुंबई हायकोर्टाकडून दिलासा मिळला आहे. परंतु आज (20 मे) सीबीआय कडून याची 5 तास चौकशी करण्यात आली . त्यानंतर समीर वानखेडे यांच्यावर निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता असल्याचं सूत्रांकडून सांगितलं येत आहे.

Sameer Wankhede CBI Inquiry

तसचं समीर वानखेडे यांची पहिल्या सत्रात तीन तास चौकशी करण्यात आली. तर दुसऱ्या सत्रात त्यांची दोन तास अशी एकूण 5 तास CBI कडून चौकशी करण्यात आली. सीबीआयने गुन्हा दाखल केल्यानंतर आता याच अहवालाच्या आधारे वानखेडे यांची सीबीआयसीकडून ( केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क ) विभागाकडून चौकशी सुरू केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे या चौकशीनंतर समीर वानखेडे यांच्यावर निलंबनाची कारवाई देखील होऊ शकते अशी सूत्रांची माहिती आहे. कारण एखाद्या अधिकाऱ्यावर जेव्हा गुन्हा दाखल होतो, तेव्हा त्याच्यावर निलंबनाची कारवाई केली जाते. यामुळे वानखेडे यांच्या अडचणीत वाढ झाली असल्याचं पाहायला मिळतं आहे.

After CBI inquiry Sameer Wankhede suspend ?

दरम्यान, काल मुंबई हायकोर्टात (Mumbai High Court) झालेल्या सुनावणी दरम्यान वानखेडे यांच्या वकिलांनी समीर वानखेडे आणि शाहरूख खान यांच्यामधील व्हॉट्सअप चॅट न्यायालयात दाखवलं होत. त्यामुळे अनेक खुलासे या प्रकरणी झाले. त्या चॅटमध्ये स्पष्ट दिसत होत की, एक बाप माझ्या मुलाची काळजी घ्या म्हणून विनंती करत आहे. जर वानखेडे यांनी खंडणी मागितली असती तर शाहरुखने त्या मेसेजमध्ये पैशांचा उल्लेख केला असता. परंतु त्या दोघांमध्ये जे बोलणं झालं त्यामध्ये कुठेही पैशांचा उल्लेख आला नाही. फक्त लेकाची काळजी घ्या, असचं म्हणणं मेसेजमध्ये पाहायला मिळत आहे. असं वानखेडे यांचे वकिल म्हणाले होते. यामुळे न्यायालयाने समीर वानखेडे यांना दिलासा देत २२ मे पर्यंत अटकेपासून संरक्षण दिलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

Original NEWS SOURCE – https://bit.ly/3pNpnur