समीर वानखेडे आणि त्यांचे वडील दाऊद मुस्लीम, निकाह लावणाऱ्या मौलाना मुजम्मिल अहमद यांचा दावा

मुंबई : कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज पार्टीवरील एनसीबीचा छोपा बोगस होता, असा दावा करणारे राज्याचे अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक हे सातत्याने एनसीबीचे मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे यांना लक्ष्य करत आहेत. यानंतर आता मलिक यांनी पुन्हा एकदा मोठा खुलासा केला. वानखेडे आणि मलिक यांच्यातील वाद दिवसेंदिवस वाढत चालला आहे.

समीर वानखेडे हे मुस्लिम असल्याचा आरोप नबाव मलिकांना केला होता. त्यावर त्यांनी अनेक पुरावेही सादर केले होते. आता नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्या पहिल्या लग्नाचा निकाहनामा ट्विट केला होता. त्यानंतर समीर वानखेडे यांचं आणि त्यांची पहिली पत्नी डॉ.शबाना कुरेशी यांचा निकाह लावणारे मौलाना समोर आले आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीनंतर एकच खळबळ माजली आहे.

मौलाना मुज्जमिल अहमद असं या मौलानाचं नाव आहे. मुज्जमिल अहम्मद यांनी नवाब मलिकांनी सादर केलेला निकाहनामा खरा असल्याचं म्हटलं आहे. असा धक्कादायक खुलासा मुज्जमिल अहमद यांनी केला आहे. शिवाय समीर आणि शबाना दोघेही मुस्लिमच आहेत. जर त्यातील एकही जण मुस्लिम नसता तर त्यांचा निकाह लावला नसता. असा धक्कादायक खुलासा मुज्जमिल अहमद यांनी केला आहे.

समीर वानखेडे, त्यांचे वडील हे मुस्लिम असल्याचंही काझी मुजम्मिल अहमद यांनी म्हटलं आहे. पुढे ते म्हणाले, समीर वानखेडे हे मुस्लिम होते. जर हिंदू असल्याचं सांगितलं असतं तर मी निकाह लावून दिलाच नसता. समीर मुसलमान होता, त्याचे वडील दाऊद मुसलमान होते, शबाना मुसलमान होती आणि तिचे वडिलही मुस्लिम होते. निकाहनामा सुद्धा हा बरोबर आहे. लोखंडवाला येथील एका हॉलमध्ये हा निकाल मोठ्या उत्साहात पार पडला होता.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा