Sameer Wankhede | CBI च्या छापेमारीनंतर समीर वानखेडेंची पहिली प्रतिक्रिया ; म्हणाले …

Sameer Wankhede | मुंबई : 2021 मध्ये आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी एनसीबीचे ( NCB) तेव्हाचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे (Sameer Wankhede) अनेक दिवस चर्चेत होते. तर आता पुन्हा एकदा समीर वानखेडे चर्चेत आले आहेत. गेल्या दोन दिवसांपूर्वी वानखेडे यांच्यावर सीबीआयने भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला असून या प्रकारनातं त्याच्या घरावर छापेमारी करण्यात आली आहे. या संबंधित आता एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

मला देशभक्त असल्याची शिक्षा मिळत आहे : समीर वानखेडे

CBI ने माझ्या घरावर छापमारी केली आहे. तब्बल 13 तास चौकशी केली असून छापेमारीमध्ये 18 हजार रुपये आणि मालमत्तेसंदर्भातील काही कागदपत्रे सीबीआयने जप्त केली. मी सेवेत रुजू होण्यापूर्वी ही मालमत्ता खरेदी केली होती. तरीही देशभक्त असल्याची मला शिक्षा मिळत आहे, असं ते समीर वानखेडे म्हणाले. याचप्रमाणे त्यांनी माझ्या सासऱ्याच्या घरी देखील छापा टाकला परंतु त्यांना त्या ठिकाणी काहीही सापडलं नाही असा दावा देखील वानखेडे यांनी केला आहे.

दरम्यान, सीबीआय कडून समीर वानखेडे यांच्या घरावर छापमारी का होत आहे याबाबत सांगायचं झालं. तर 2021 मध्ये आर्यन खानला ड्रग्ज प्रकारात अडकवल्या प्रकरणी अटक न करणासाठी 25 कोटी रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी सीबीआयने समीर वानखेडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यामुळे एनसीबीच्या सात अधिकाऱ्यांच्या चौकशी करण्यात आली होती. त्यामध्ये समीर वानखेडे यांचं देखील नाव होतं. यामुळे आता समीर वानखेडे याच्या भोवती सीबीआयच चक्र फिरलेलं पाहायला मिळतं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-