आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी समीर वानखेडे दबावात?; पत्नी क्रांती रेडकरचा खुलासा

मुंबई : काही दिवसांपूर्वी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात अटक केल्यानंतर एनसीबीचे मुंबई झोनल ऑफिसर समीर वानखेडे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. या सगळ्यात समीर वानखेडे यांच्यावर दबाव असल्याचे म्हटले जात आहे. मात्र त्यांची पत्नी मराठी अभिनेत्री क्रांती रेडकर हिने खुलासा केला आहे.

माध्यमांशी बोलताना क्रांतीने सांगितले की, ‘दबावाला हँडल करणे समीर यांच्यासाठी खूप सोपे आहे ते काम ते खूप व्यवस्थितरित्या हाताळतात. ते आमच्या ऐतिहासिक लीडर्ससोबत कनेक्ट आहेत. लोक समीर यांना सिंघम म्हणून ओळखतात मात्र खऱ्या आयुष्यात समीर यांचे वडिल रिटायर्ड पोलीस ऑफिसर आहेत.’

याआधी देखील क्रांतीने समीर यांच्या विषयी अनेक खुलासे केले होते. समीर हे आपल्या कामाशी प्रामाणिक असून त्यांनी कामासाठी आपले वयक्तिक आयुष्य पणाला लावले असल्याचे क्रांतीने म्हटले होते. तसेच मला त्यांचा आणि त्यांच्या कामाचा अभिमान असून मी नेहमी त्यांच्या कामाचा आदर करते असे देखील क्रांतीने सांगितले होते.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा