Samsung Mobile | सॅमसंगच्या ‘या’ मोबाईलवर बंपर डिस्काउंट, करा आजच खरेदी

Samsung Mobile | टीम महाराष्ट्र देशा: सॅमसंग (Samsung) नेहमी आपल्या वापरकर्त्यांसाठी आकर्षक ऑफर (Offer) घेऊन येत असते. त्यामुळे देशांमध्ये सॅमसंगची लोकप्रियता दिवसेंदिवस अधिक वाढत चालली आहे. अशाच समसंग आपल्या स्मार्टफोनवर बंपर डिस्काउंट देत आहे. कंपनी आपल्या Galaxy M32 Prime Edition या मोबाईलवर डिस्काउंट देत आहे. हा स्मार्टफोन तुम्ही ॲमेझॉनवर खरेदी करू शकतात.

Samsung Galaxy M32 Prime Edition वर बंपर डिस्काउंट

Galaxy M32 Prime Edition हा स्मार्टफोन तुम्ही ॲमेझॉनवर 13, 499 रुपयांमध्ये खरेदी करू शकतात. कंपनी या स्मार्टफोनवर अनेक ऑफर देत आहे. ग्राहक हा स्मार्टफोनवर HDBC बँकेच्या डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्डचा वापर करून 300 रुपयांचा डिस्काउंट मिळू शकतात. त्याचबरोबर तुम्हाला या फोनवर एक्सचेंज ऑफर देखील मिळू शकते. या एक्सचेंज ऑफरअंतर्गत तुम्हाला 12,650 रुपायांपर्यंत डिस्काउंट मिळू शकतो. तुम्ही या संपूर्ण ऑफर वापरल्यानंतर तुम्हाला हा फोन फक्त 850 रुपयांमध्ये मिळू शकतो. एक्सचेंज ऑफरसाठी तुमच्या जुन्या फोनची स्थिती व्यवस्थित पाहिजे, जेणे करून तुम्हाला या ऑफरचा पुरेपूर लाभ घेता येईल.

Samsung Galaxy M32 Prime Edition फीचर्स

Galaxy M32 Prime Edition या स्मार्टफोनमध्ये 90Hz रिफ्रेश रेटसह 6.4 इंच AMOLED डिस्प्ले देण्यात आलेला आहे. या फोनच्या प्रोसेसरबद्दल जर बोलायचे झाले, तर यामध्ये MediaTek Helio G80 प्रोसेसर देण्यात आलेले आहे. या फोनमध्ये 8 जीबी पर्यंत RAM दिलेला असून 228 जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेज दिलेले आहे.

Galaxy M32 Prime Edition कॅमेरा

या स्मार्टफोनच्या कॅमेऱ्याबद्दल जर बोलायचं झाले, तर यामध्ये क्वाड-कॅमेरा सेटअप देण्यात आलेला आहे. यामध्ये 64 मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा, 8 मेगापिक्सल अल्ट्राव्हाइड अँगल कॅमेरा, 2 मेगापिक्सल मायक्रो कॅमेरा आणि 2 मेगापिक्सल डेप्थ सेंसर कॅमेरा देण्यात आलेला आहे. या स्मार्टफोनच्या बॅटरीबद्दल जर बोलायचे झाले, तर यामध्ये 6,000mAh बॅटरी देण्यात आलेली आहे.

महत्वाच्या बातम्या

 

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.