Samsung Mobile Launch | नवीन वर्षात ‘या’ दिवशी लाँच होणार Samsung Galaxy F04

Samsung Mobile Launch | टीम महाराष्ट्र देशा: नवीन वर्षामध्ये अनेक मोबाईल (Mobile) उत्पादक कंपन्या त्यांचे नवीन मॉडेल बाजारामध्ये लाँच (Launch) करणार आहे. अशा परिस्थितीमध्ये आघाडीची मोबाईल उत्पादक कंपनी सॅमसंग (Samsung) देखील या वर्षाच्या सुरुवातीला नवीन मोबाईल लाँच करणार आहे. कंपनीने नुकतेच या स्मार्टफोनच्या लॉन्चिंगची घोषणा केली आहे. त्याचबरोबर कंपनीने या फोनच्या फीचर आणि किमतीबद्दल देखील माहिती दिली आहे.

सॅमसंग या वर्षाच्या सुरुवातीला Samsung Galaxy F04 हा स्मार्टफोन बाजारामध्ये लाँच करणार आहे. फ्लिपकार्टच्या माध्यमातून कंपनीने या फोनची लॉन्चिंग तारीख जाहीर केली आहे. हा फोन 4 जानेवारी दुपारी 12 वाजेपासून फ्लिपकार्टवर उपलब्ध होणार आहे.

Samsung Galaxy F04 फीचर्स

Samsung Galaxy F04 या स्मार्टफोनमध्ये 6.5 इंच HD+ डिस्प्ले आणि वॉटर ड्रॉप नॉच डिस्प्ले देण्यात आला आहे. या फोनमध्ये MediaTek Helio P35 प्रोसेसर उपलब्ध आहे. या मोबाइलमध्ये 8 जीबी पर्यंत RAM आणि 32 जीबी इंटरनल स्टोरेज मिळू शकते. या फोनच्या कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाले, तर या फोनमध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आलेला आहे. यामध्ये 13MP बॅक कॅमेरा आणि 2MP डेप्थ कॅमेरा उपलब्ध असू शकतो. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी या फोनमध्ये 5MP फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो. या फोनमध्ये 5,000mAh बॅटरी उपलब्ध असू शकते.

किंमत

या फोनच्या किमतीबद्दल बोलायचे झाले, तर फ्लिपकार्टवर या फोनची किंमत 8,000 रुपयांपेक्षा कमी असू शकते. हा फोन बाजारामध्ये दोन रंगाच्या पर्यायासह उपलब्ध होणार आहे. यामध्ये जेड पर्पल आणि ओपल ग्रीन या रंगाचा समावेश आहे.

महत्वाच्या बातम्या