Sanajy Raut | “मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई हरवले आहेत” : संजय राऊत

Sanjay Raut | मुंबई : गेल्या काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील प्रश्न सोडवण्यासाठी राज्य शासनाकडून दोन मंत्र्यांची नियुक्ती करण्यात आली होती. तर मुंबईमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठकी घेण्यात आली होती या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता. यामध्ये उच्च तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील ( Chandrakant Patil) आणि उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई ( Shambhuraj Desai) या दोघांवर ही जबाबदारी सोपवण्यात आली होती. तर सध्या खासदार दंजय राऊत यांनी एक ट्विट करत चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई हरवलेले आहेत असा पोस्टर करते ट्विट केलं आहे. त्यामधून संजय राऊतांनी ( Sanjay Raut) दोघांवर निशाणा देखील साधला आहे.

इतिहासात याची नोंद राहील : संजय राऊत

ट्विट करत संजय राऊतांनी म्हटलं आहे की, चंद्रकांत पाटील व शंभूराजे देसाई या दोन मंत्र्यांची सीमा भागासाठी समन्वयक मंत्री म्हणून नियुक्ती केली आहे. या भागातील मराठी जनता आपल्या अस्तित्वाची लढाई स्वतः एकटी लढत आहेत अशा परिस्थितीत देखील हे दोन जबाबदार मंत्री सीमा भागात फिरकले नाहीत. यामुळे इतिहासात याची नोंद राहील. Shame!Shame!! मराठी माणसांचे… असं ट्विट संजय राऊतांनी केलं आहे.

( Sanjay Raut Commented On Chandrakant Patil and Shambhuraj Desai)

दरम्यान, राऊतांनी एक पोस्ट देखील शेयर करत त्यावर हरवलेले आहेत असं लिहलं आहे. याच प्रमाणे सीमाभागातील लोकांना आधार न देता त्यांनी त्यांचा हात असाच वाऱ्यावर सोडून देऊन कोणत्या बिळात लपले आहेत असा सवाल देखील उपस्थित केला आहे. यामुळे राऊतांचं हे ट्विट सध्या चांगलंच चर्चेत आहे.

महत्वाच्या बातम्या-

 

You might also like