InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

वाळू माफियांचा अधिकाऱ्यावर हल्ला

शहरातील आकाश गार्डनजवळ अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर अडवले असता पाच ते सहा जणांनी प्रातांधिकारी डॉ.विक्रांत बांदल यांना मारहाण केल्याची घटना घडली. प्रातांधिकारी हे तहसील कार्यालयात आयोजित आढावा बैठकीस जात असताना ही घटना घडली.

शिरपूर तहसील कार्यालयात अप्पर जिल्हाधिकारी नंदकुमार बेडसे यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय योजनांच्या कामाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या बैठकीसाठी प्रातांधिकारी डॉ.विक्रांत बांदल हे आपल्या कार्यालयातून तहसील कार्यालयाकडे निघाले होते. तेव्हा त्यांना आकाश गार्डनजवळ वाळूने भरलेले ट्रॅक्टर दिसले. त्यांनी गाडी थांबवून ट्रॅक्टर अडवले. प्रातांधिकारी डॉ.बांदल हे ट्रॅक्टरसोबत असलेल्या लोकांना वाळूसंदर्भात विचारणा करत असतानाच पाच ते सहा जणांनी त्यांच्यावर हल्ला चढवला. त्यांना मारहाण करुन ते ट्रॅक्टर घेऊन तेथून पसार झाले.

महत्वाच्या बातम्या-

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply