Sandeep Deshpande | “जेव्हा आम्ही सत्तेत येऊ तेव्हा रिमोट कंट्रोल…”; संदीप देशपांडे यांचा दावा

मुंबई : आज मनसेच्या पदाधिकाऱ्यांची मुंबईमध्ये बैठक पार पडली. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना स्वबळावर निवडणूक लढवण्याचं जाहीर करत, तयारीला लागा, असे आदेश दिले आहेत. याच पार्श्वभूमीवर मनसे पक्षाचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी एक मोठा दावा केला आहे.

काय म्हणाले संदीप देशपांडे ?

बाळासाहेब ठाकरे यांचे विचार, शिकवण राज यांच्या रक्तारक्तात भिनलेली आहे. बाळासाहेबांनी कधी एकतरी पद घेतलं का? तीच शिकवण राज ठाकरेंकडे आहे. सत्तेचा रिमोट कंट्रोल बाळासाहेबांनी नेहमी स्वत:कडे ठेवला. जेव्हा आम्ही सत्तेत येऊ तेव्हा रिमोट कंट्रोल राज ठाकरेंकडे असेल, असा दावा संदीप देशपांडे यांनी केला आहे. देशपांडे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला, त्यावळी ते बोलत होते.

सर्व महानगरपालिकेच्या सर्व जागा स्वबळावर लढवण्याचे निर्देश राज ठाकरे यांनी दिले. त्या कशा लढवायच्या यासंदर्भातील मार्गर्शनही राज ठाकरेंनी मनसे पदाधिकाऱ्यांना केलं असल्याचं संदीप देशपांडे यांनी सांगितलं आहे.

पुढे बोलताना संदीप देशपांडे म्हणाले की, झालेल्या बैठकीमध्ये राज यांनी तेच सांगितलं, ज्या पद्धतीचा एक प्रचार सुरु आहे खोटा आम्ही रडलो तर लोकांच्या डोळ्यात पाणी येईल. त्या खोट्या प्रचाराला बळी पडू नका. अशी कोणतीही सहानुभूतीची लाट नाही, असं राज ठाकरेंनी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.