Sandipan Bhumare | संदीपान भुमरे यांची शस्त्रक्रिया सुरु असतानाच लाईट गेली अन्… ; सरकारी रुग्णालयात गोंधळ

औरंगाबाद : एकनाथ शिंदे गटातील नेते वारंवार काही ना काही विषयामुळे चर्चेत येतात. मात्र, यावेळी शिंदे गटातील म्हणजेच बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे नेते संदीपान भुमरे यांचं कौतुक केलं जातं आहे. भुमरे यांची शस्त्रक्रिया सुरु असतानाच लाईट गेल्यामुळे औरंगाबाद येथील सरकारी रुग्णलयात चांगलाच गोंधळ उडाला. विशेष म्हणजे लाईट गेल्यावर देखील रुग्णालयात जनरेटरची सोय नसल्याने भुमरेंनी संताप व्यक्त केला आहे.

संदीपान भुमरे यांनी औरंगाबाद येथील सरकारी रुग्णालयाची केली पाहणी –

संदीपान भुमरे काल औरंगाबाद येथील सरकारी रुग्णालयाची पाहणी करण्यास गेले होते. यावेळी पाहणी करताना दंत चिकित्सा विभागात पोहोचले. यावेळी व्यवस्थेची विचारपूस करुन त्यांनी डाॅक्टरांना त्यांच्या दाताची तक्रार सांगितली. यावर ऑपरेशन करण्याचा सल्ला डाॅक्टरांनी दिला.

यादरम्यान, ऑपरेश सुरु असतानाच लाईट गेली. तसेच जनरेटरची ही सोय नव्हती. तरी रुग्णालयात ऑपरेशन थेएटरमध्ये अनेक डाॅक्टर उपस्थित असल्याने फोनच्या टाॅर्चवर त्यांची शस्त्रक्रिया पुर्ण करण्यात आली.

यानंतर भुमरेंनी जनरेटर नसल्याचा जाब विचारला. याला उत्तर देत जनरेटरची मागणी मागच्या पाच वर्षांपासून केली आहे. मात्र, त्यावर आजतागायत निर्णय झालेला नाही, असं आधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. यावर तातडीने निर्णय घेत भुमरेंनी रुग्णालयातूनच जनरेटरचा प्रस्ताव तातीडनं मंजुरीचे निर्देश दिले. तसेच जोपर्यंत नवा जनरेटर पोहोचत नाही. तोपर्यंत कोविड सेंटरमधला जनरेटर सरकारी रुग्णालयात नेण्याच्या सूचना देखील त्यांनी दिल्या.

दरम्यान, भुमरेंनी आधी रुट कॅनल केलं आणि त्यानंतर शस्रक्रियेसाठी दवाखान्यात पोहोचले होते. मात्र, संदीपान भुमरे मंत्री असून देखील सरकारी रुग्णालयात उपचारासाठी गेले म्हणून त्यांचं कौतुक केलं जातं आहे.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.