Sandipan Bhumre | “अंधारे पैठणमध्ये संध्याकाळी आल्या, त्यांना काय…”, संदीपान भुमरेंचा सुषमा अंधारेंवर पलटवार
Sandipan Bhumre | मुंबई : औरंगाबाद येथील सभेला संबोधित करताना त्यांनी सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी रावसाहेब दानवे (Ravsaheb Danve) आणि संदीपान भुमरे (Sandipan Bhumre) यांना डिवचण्याचं काम केलं आहे. यालाच आता संदीपान भुमरे यांनी प्रत्युत्तर दिलं असून त्यांनी देखील अंधारेंवर जोरदार घणाघात केला आहे.
यावेळी, सुषमा अंधारे या पैठणमध्ये संध्याकाळी आल्या, त्यांना काय विकास दिसणार?, असा खोचक सवाल संदीपान भुमरे यांनी केला आहे. तसेच त्या मतदारसंघात अर्ध्या तास थांबल्या, स्थानिक नेत्यांनी टीका केली असती तर ठीक होत, असं प्रत्युत्तर देखील भुमरे यांनी दिलं आहे.
सुषमा अंधारे यांनी किती सभा घेतल्या. त्यांच्या सभेला किती गर्दी आली तर काहीही होणार नाही, कारण त्यांनी अडीच वर्षात काहीही केलं नाही, आम्ही लोकांची कामं केलीत म्हणून लोकांची कामं केलीत, म्हणून लोक आमच्या पाठिशी आहेत, असा टोला देखील भुमरेंनी लगावला आहे.
दरम्यान, मी आता एका एका भावाची काळजी घेत बोलत बोलत पैठणमध्ये आले आहे, मी बहीण आहे आणि मी माझ्या भावाला ओवाळायला आले आहे, माझ्या या भावाने लोकांसाठी काम केलं, आमच्या भावाने लोकांची गरज ओळखली असून पैठणमध्ये भुमरे यांनी काय दिवे लावले? राज्यातील देवस्थाने सुंदर आहेत. परंतु पैठण आणि नाथ मंदिराची दुरावस्था झाली आहे. पैठणकडे रावसाहेब दानवे यांनीही लक्ष दिले नाही, असा घणाघात सुषमा अंधारे यांनी संदीपान भुमरे यांच्यावर केला होता.
महत्वाच्या बातम्या :
- Sanjay raut | “…अन्यथा भारताचा पाकिस्तान झाला असता”, संजय राऊतांचा हल्लाबोल
- Chitra Wagh | “देशासाठी २ निरुपयोगी जीव”; चित्रा वाघ यांची तुषार गांधी, राहुल गांधींवर टीका
- MNS | मनसे आक्रमक! राहुल गांधी यांच्या निषेधार्थ नवी मुंबईत आंदोलन
- Maruti Alto K10 CNG | मारुतीची Alto K10 कार CNG व्हर्जनमध्ये लाँच
- Ranjeet Savarkar | मोठी बातमी! रणजीत सावरकर राज ठाकरेंच्या भेटीला, राहुल गांधींच्या वक्तव्याबाबत चर्चा होण्याची शक्यता
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.