Sandipan Bhumre | मुख्यमंत्र्यांच्या सभेला जमली मोठी गर्दी, संदीपान भुमरेंनी पैसे देऊन जमवली का गर्दी?

औरंगाबाद : एकनाथ शिंदे यांची पैठणी येथे सभा होत आहे. शिंदे आता पैठण येथे पोहोचले असून या सभेला मोठ्या प्रमाणात गर्दी जमली आहे. मात्र सभेपूर्वी व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिप नुसार संदीपान भुमरे यांनी ही गर्दी पैसे देऊन जमवली आहे का? असा सवाल निर्माण होत आहे. त्यामुळे चंद्रकांत खैरे यांचे आरोप खरे आहेत का हे पाहणं महत्वाचं ठरेल.

संदीपान भुमरे यांच्यावर या सभेची पूर्ण जबाबदारी:

संदीपान भुमरे यांच्यावर या सभेची पूर्ण जबाबदारी आहे. या सभेला मराठवाड्यामधील मोठे दिग्गज नेते तसेच भाजप नेते देखील उपस्थित आहेत. या सभेला होणारी गर्दी ही पैसे देऊन जमवलेली गर्दी असल्याचा आरोप शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केला होता. मात्र सभेच्या काही वेळपूर्वीच हा आरोप भुमरेंनी फेटाळून लावला.

जंगी होणार असून रेकाॅर्ड ब्रेक सभा होणार:

होणारी सभा ही जंगी होणार असून रेकाॅर्ड ब्रेक सभा होणार असल्याचं भुमरे यांनी सांगितलं आहे. मात्र, ही सभा फेल व्हावी असं विरोधकांना वाटत असल्याने बनावट क्लिप व्हायरल केल्या जात असल्याचा आरोप संदिपान भुमरे यांनी केला आहे. एवढंच नाही तर ही सभा बाळासाहेब ठाकरेंच्या १९९४ साली झालेल्या सभा प्रमाणे होईल, असं देखील भुमरे म्हणाले.

दरम्यान, सभेला जमलेल्या मोठ्या गर्दीमध्ये सामान्य लोक किती आहेत? असा सवाल निर्माण होत असून अंगणवाडी सेविकांना देखील पैसे देऊन सभेला आणले असल्याचे म्हटलं जात आहे.

महत्वाच्या बातम्याः

महत्वाच्या बातम्या

Comments are closed.