Sandipan Bhumre | “सभा फेल व्हावी म्हणून बनावट क्लिप व्हायरल केल्या जात असून…”, संदीपान भुमरेंचं प्रत्युत्तर

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज पैठण मध्ये सभा होत आहे. मात्र सभेपूर्वी व्हायरल झालेल्या एका ऑडिओ क्लिपने चांगलाच धुमाकूळ उडवला आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये सभेसाठी पैसे देऊन गर्दी जमा करण्यात आल्याचा आरोप शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केला. अशातच आता समोर आलेल्या ऑडीओ क्लिपवर हमी योजना मंत्री संदीपान भुमरे यांनी उत्तर दिलं आहे.

संदीपान भुमरे यांचं चंद्रकांत खैरे यांना प्रत्युत्तरः

चंद्रकांत खैरे जनतेचा अपमान करत आहेत, असं संदिपान भुमरे यांनी म्हटलं आहे. तसेच मी कुणाला पैसे वाटले नसून पुरावे दाखवा, असं आवाहन देखील संदिपान भुमरे यांनी खैरेंना दिलं आहे. या क्लिपबाबत बोलत असताना ही क्लिप बनावट असून विरोधकांनी मुद्दामून व्हायरल केली असल्याचं भुमरे यांनी म्हटलं आहे. तसेच या ऑडिओ क्लिपचा कसलाही परिणाम आमच्या सभेवर होणार नसून जनता आमच्या सभेला मोठ्या प्रमाणात हजर राहील असं भुमरे यांनी ठासून सांगितलं आहे.

रेकाॅर्ड ब्रेक सभा होणारः

होणारी सभा ही जंगी होणार असून रेकाॅर्ड ब्रेक सभा होणार असल्याचं भुमरे यांनी सांगितलं आहे. मात्र, ही सभा फेल व्हावी असं विरोधकांना वाटत असल्याने बनावट क्लिप व्हायरल केल्या जात असल्याचा आरोप संदिपान भुमरे यांनी केला आहे. एवढंच नाही तर ही सभा बाळासाहेब ठाकरेंच्या १९९४ साली झालेल्या सभा प्रमाणे होईल, असं देखील ते म्हणाले.

दरम्यान, शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या औरंगाबाद सभेमध्ये झालेल्या गर्दीची चांगलीच चर्चा रंगली होती. अशातच आता त्यांच्या तुलनेत एकनाथ शिंदे यांच्या सभेला किती गर्दी होती हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. एवढंच नाही तरी या सभेतल्या गर्दीवरून जनतेला कोणती सरकार मान्य आहे, हे देखील दिसून येऊ शकेल.

महत्वाच्या बातम्याः

महत्वाच्या बातम्या

Comments are closed.