InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

‘उंबरी’मध्ये ‘वाळूमाफिया’राज

- Advertisement -

शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे नेहमीच दुर्लक्ष होत असताना आता वाळुमाफियांमुळेही शेतकरी देशोधडीला लागत असल्याचा प्रकार नांदेडमध्ये घडतोय. परंतु याकडे प्रशासन अधिकारी हेतूपुरस्सूर दुर्लक्ष करत आहेत का, असा सवाल या ठिकाणी शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जातोय.

- Advertisement -

उंबरी तालुक्यातील महाठी इथल्या वाळू धक्क्यावर प्रचंड असा रेतीचा उपसा सुरू असून बेकायदेशीरपणे जेसीबीचा वापर करून रात्रदिवस येथून प्रचंड प्रमाणावर रेती उपसा केला जातोय. रेतीचा उपसा करण्यासाठी शेतकऱ्यांच्या नदी पात्रातील लहान लहान विहिरी येथील वाळूमाफियांनी जबरदस्तीने बुझवून टाकल्या आहेत. वाळूमाफियांच्या धमक्यांमुळे येथील शेतकरी भयभीत असून या सर्व प्रकरणामुळे हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांच्या नदीपात्रामधील मोटारीदेखील फेकून देण्यात आल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे.

मात्र, प्रशासनाकडून या वाळूमाफियांवर कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसल्याने हवालदिल झालेले शेतकरी आता महसूलमंत्र्याकडेच दाद मागणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

Comments are closed.