संभाजी भिडेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना हात जोडले; ‘सांगली बंद’ शिवसेना विरोधात नाही

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.  उद्धव ठाकरे हे सांगली जिल्ह्यात येत असताना संभाजी भिडे यांनी ‘सांगली बंद’ची हाक दिली आहे. उदयनराजे भोसले यांच्याविषयी संजय राऊत यांनी जे वक्तव्य केलं होतं त्याविरोधात हे आंदोलन करण्यात येत आहे.

‘संजय राऊत असो किंवा गोयल असो, शिवरायांच्या परंपरेला कलंक लागेल असं वागलेलं चालणार नाही. संजय राऊत यांनी ठिणगीला पाय लावला आहे. ते त्या स्थानावर राहता कामा नये. उदयनराजेंचा अपमान सहन करणार नाही. संजय राऊत यांना पदावरुन दूर करा अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना हात जोडून आहे,’ असे संभाजी भिडे म्हणाले.

‘हा बंद कोणत्याही पक्षाविरोधात नाही. पूर्ण देशावर शिवसेनेचं राज्य असावं इतका त्यांच्याबद्दल आदर आहे. देशाने आदर्श घ्यावा असं बंद पाळला पाहिजे असं संभाजी भिडे यांनी यावेळी सांगितलं. बंद काळात कोणत्याही प्रकारची हिंसा केली जाऊ नये, असे आवाहनही संभाजी भिडेंनी केले आहे.

आता काही स्मार्टफोनमध्ये नाही चालणार WhatsApp

दरम्यान, संजय राऊत यांनी उदयनराजे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहेत याचे पुरावे द्यावे असं म्हटलं होतं. याच वक्तव्याचा निषेध नोंदवण्यासाठी उद्या शिवप्रतिष्ठानतर्फे सांगली बंद पुकारण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.