यूएईचा गोल्डन व्हीझा मिळवणारा पहिला बॉलीवूड अभिनेता ठरला संजय दत्त

मुंबई : बॉलिवूडचा खलनायक अभिनेता संजय दत्त नेहमीच त्याच्या हटके अंदाजामुळे चाहत्यांचे मन जिंकत असतो. तो त्याच्या चाहत्यांशी सोशल मीडियावर संवाद साधताना दिसत असतो. संजय दत्तने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत त्याला दुबईच्या संयुक्त अरब अमिरातने गोल्डन व्हीझा दिल्याची माहिती दिली आहे.

संजय दत्तला दुबईच्या संयुक्त अरब अमिरातने गोल्डन व्हीझा दिला आहे. तसेच हा गोल्डन व्हीझा मिळवणारा संजय दत्त पहिला अभिनेता ठरला आहे. यानंतर संजयने यूएईमधल्या सरकारचे आणि अधिकार्‍याचे आभार मानले आहे.

गोल्डन व्हीझा हा 5 ते 10 वर्ष या कालावधीसाठी देण्यात येतो आणि त्याची आपोआप मुदत वाढ होऊन तो रिन्यू होतो. या बदलांमुळे विशिष्ट क्षेत्रात कामासाठी, शिकण्यासाठी किंवा राहण्यासाठी येणार्‍या नागरिकांना दिलासा मिळतो. तसेच, त्यासाठी काही अटी आणि नियम देखील देण्यात आले आहेत.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा