Sanjay Gaikwad | कालचा मोर्चा अभद्र युतीचा; संजय गायकवाड यांची टीका, संजय राऊतांवर पलटवार

Sanjay Gaikwad | बुलढाणा : काल मुंबईमध्ये महाविकास आघाडीच्यावतीने राज्यपालांच्या वक्तव्याविरोधात मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली होती. आज सकाळी सातारा येथे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटातील आमदार यांच्यावर शिंदे गटातील आमदारांची बुद्धी नॅनो झाली आहे, अशी टीका केली आहे. या टीकेला शिंदे गटातील बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

संजय गायकवाड म्हणाले, “आमची बुद्धी नॅनो नाही तर प्रगल्भ आहे. बुद्धी त्यांची नॅनो झाली जे बाळासाहेबांची विचार सोडून अभद्र युतीच्या मार्गाने गेले. कालचा मोर्चा अभद्र युतीचा होता आणि मोर्चात सहभागी तीन लाखांची घोषणा केल्यानंतर तीस हजार लोक जमा करता आले नाही, हे त्यांचे अपयश आहे.”

हे सरकार नॅनो कारच्या कारखान्यासारखे बंद पडणार, अशी टीका संजय राऊत यांनी केली होती. यावर शिंदे गटातील आमदार संजय गायकवाड यांनी प्रत्युत्तर दिले आहे, ते म्हणाले, “संजय राऊतांना दिवसा स्वप्न पडतात. कारखाना बंद पडणार, प्रोडक्शन बंद होणार ही गोष्ट वेगळी आहे. आमचे सरकार कार्यकाळ तर पूर्ण करणारच आणि आणखी यांना 15 वर्षे येवू देणार नाही, हे सरकार पुन्हा येईल अशा प्रकारचे काम मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे चालू आहे.”

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed.