Sanjay Gaikwad | “…तर शिंदे गट आणि भाजपात वितुष्ट निर्माण होऊ शकतं”; शिंदे गटातील आमदाराचा इशारा

Sanjay Gaikwad | मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांनी मराठवाडा विद्यापीठाच्या एका कार्यक्रमात बोलताना थेट छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं. या विधानानंतर भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी (Sudhanshu Trivedi) यांनी देखील छत्रपती शिवाजी महाराजांबाबत एका कार्यक्रमात विधान केलं. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि त्रिवेदींच्या विरोधात शिवसेनेबरोबरच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळालं. यावर आता शिंदे गटाने देखील निर्वाणीचा इशारा देत भाजपला सुनावलं आहे. बुलढाण्यातील आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी या मुद्द्यावरून शिंदे गट आणि भाजपात वितुष्ठ निर्माण होऊ शकतं, असा थेट इशारा दिला आहे.

ते म्हणाले, राज्यपाल कोश्यारी आणि भाजपचे प्रवक्ते शिवाजी महाराजांवर बोलत राहिले, तर सरकारमध्येच वितुष्ट निर्माण होईल.  त्याचे परिणाम दोन्ही गटाला भोगावे लागतील, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. तसेच भाजपाच्या लोकांनी छत्रपती शिवरायांबद्दल विचार करून बोलावं, असंही म्हटलं.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबदद्ल राज्यपाल कोश्यारी आणि भाजपचे प्रवक्ते हे अपमानास्पद बोलतात. भाजपच्या नेत्यांशी शिवाजी महाराज यांच्याबद्दल विचार करून बोललं पाहिजे. यानंतर अशा प्रकारचा अपमान आम्ही लोकं सहन करणार नाही. वरिष्ठ भाजपच्या नेत्यांच्या लक्षात आणून देऊ. शिवाजी महाराज यांचा अपमान नेहमी होत असेल तर हे काही चांगलं नाही, असंही संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) म्हणाले.

“भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी सावकरकरांच्या मुद्द्यावर सावरकरांनी पाचवेळा माफी मागितली, तसेच पत्र छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला लिहिले होते अशी भाषा वापरली. त्या त्रिवेदींनी एक गोष्ट लक्षात घ्यावी की, छत्रपती शिवाजी महाराजांनी बालसंभाजीसह आग्र्याला औरंगजेबाच्या ज्या दरबारात कोणी मान वर करत नाही, त्या दरबारात ताठ मानेने खडेबोल औरंगजेबाला खडेबोल सुनावण्याचं धाडस दाखवलं”, असंही संजय गायकवाड यांनी म्हटलंय.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.