Sanjay Gaikwad | “त्या खेकड्याला कोण मारणार?”; संजय गायकवाड यांची संजय राऊतांवर टीका

Sanjay Gaikwad | मुंबई : महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील वाद वाढत चालला आहे. दोन राज्यांमधील हा वाद पाच दशकांहून अधिक जुना आहे. त्यामुळे राजकारणही होत आहे. अशातच बेळगाव येथे महाराष्ट्राच्या ट्रकवर दगडफेक करण्यात आली आहे. बेळगावजवळ हिरेबागवाडी टोल नाक्याजवळ कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांकडून महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला करण्यात आला आहे.

यांनतर विरोधी पक्षांकडून सत्ताधाऱ्यांवर टीका केली जात आहे. अशातच “महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावरून वारंवार परखड भूमिका मांडत असल्याने कन्नड रक्षण वेदिकेकडून मला धमकीचे फोन आल्याचा दावा संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलाय. संजय राऊतांच्या या दाव्यानंतर एकनाथ शिंदे गटातील आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी टोला लगावला आहे.

खासदार संजय राऊतांना जीवे मारण्याची धमकी आली. यावर विचारलेल्या प्रश्नावर शिंदे गटातील आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी ‘त्या खेकड्याला कोण मारणार आहे?’, अशी टीका केली आहे. संजय राऊत (Sanjay Raut) हे प्रसिद्धीसाठी अशी वक्तव्य करत असल्याचं संजय गायकवाड म्हणालेत.

दरम्यान, कर्नाटक महाराष्ट्र सीमावाद पेटलेला असताना मुख्यमंत्री हे षंढ आहेत अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली होती. त्यावर आता काय मुख्यमंत्र्यांनी तलवार घेऊन सीमेवर लढायला जायचं का?, असा प्रश्न बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी केलाय. सोबतच केंद्राने यामध्ये पुढाकार घेऊन दोन्ही राज्यांची मध्यस्थी करावी असेही आमदार गायकवाड म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.