Sanjay Gaikwad | संजय राऊत मोकाट सोडलेला बोकडाची औलाद ; संजय गायकवाड यांची टीका

Sanjay Gaikwad | बुलढाणा : मुंबईत एका कार्यक्रमात बोलताना संजय राऊत यांनी शिंदे गटावर हल्लाबोल केला होता. ५० रेडे परत गुवाहाटीला जात आहेत. त्यांनी हवं ते दर्शन घ्या मात्र सुदर्शन चक्र आमच्या हातात आहे. या ५० रेड्यांचा नायनाट झाल्याशिवाय राहणार नाही, असे राऊत म्हणाले होते. तुरुंगातून बाहेर आल्यापासून संजय राऊत शिंदे गटातील आमदारावर टीका करत आहेत. त्यांनी रेडे असा उल्लेख केल्यामुळे शिंदे गटातील आमदार संजय गायकवाड चांगलेच संतापले आहे. त्यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे.

संजय गायकवाड म्हणाले, “संजय राऊत यांनी ५० रेडे गुवाहाटीला चालले आणि आमचे सुदर्शन चक्र त्याचा नायनाट करेल, अशी भाषा वापरली. ते आम्हाला रेडेच म्हणत असतील तर कदाचित आम्ही ज्ञानेश्वर माऊलींनी ज्या रेड्यांच्या तोंडून वेद बोलावले असतील तो हिंदुत्वाचा वेद म्हणणारे रेडे नक्कीच आहोत. राहिला सुदर्शन चक्राचा विषय तर श्रीकृष्णाच्या  सुदर्शन चक्राने अधर्मावर घाव घातलेला आहे. संजय राऊत तुम्ही उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला काँग्रेस राष्ट्रवादीसोबत जाण्याचा अधर्म केलेला आहे. त्यामुळे तुमचा राजकीय नायनाट होणार होईल. तुम्ही सारखे आम्हाला रेडे म्हणता तुमची औकाद एखाद्या गावात सांडासारखा मोकाट बोकड सोडलेला असतो. ज्याला कोणी कापत सुद्धा नाही. ज्याचा वास येतो, ज्यावा कोणी स्पर्श करत नाही. अशा बोकडांची तुम्ही औलाद आहात.”

काय म्हणाले होते संजय राऊत ?- 

“शिवसेनेच्या स्थापनेनंतर १८० सेना निघाल्या. पण दोनच टिकल्या एक भारतीय सेना आणि दुसरी आपली शिवसेना. काही लोक म्हणत आहेत की, २०१९ चा बदला आता घेतला, मात्र शिवसेनेचा बदला घेणाऱ्यांची १०० पितरं खाली यायला पाहिजेत. बदला तर आम्ही घेणार. या मुंबईसाठी पन्नास वर्षे शिवसेनेने रक्ताचे पाणी करून तुम्हाला मोठं केलं मात्र तुम्ही शिवसेना फोडली नाही तर, तुमचे नशीब फोडले आहे. या पुढे आपल्या नशिबात दिवाळी आणि इतरांच्या होळी असेल.”

महत्वाच्या बातम्या : 

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.