Sanjay Gaikwad | “आदित्य ठाकरेंनी चांगली पोरगी बघून लग्न करावं, विनाकारण औकातीपेक्षा जास्त बोलू नये”

Sanjay Gaikwad | मुंबई : : युवासेनेचे प्रमुख आणि माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना खुलं आव्हान दिलं आहे. ‘हिंमत असेल तर राजीनामा देऊन वरळीतून लढवून दाखवा. तुम्ही निवडून कसे येता हे पाहतो’, असे ओपन चॅलेंज आदित्य ठाकरे यांनी दिले आहे.

यावर अनेक प्रतिक्रिया उमटत असतानाच शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी खोचक सल्ला दिला आहे. “आदित्य ठाकरेंचं वय ३२ वर्षे झालं आहे, त्यांचं लग्नाचं वय उलटून गेलं आहे. त्यांनी चांगली पोरगी बघून लग्न करावं. चांगला संसार करावा, विनाकारण आपल्या औकातीपेक्षा जास्त बोलू नये”, असा घणाघात संजय गायकवाड यांनी केला आहे.

आदित्य ठाकरेंनी आपली कुवत पाहून, ताकद पाहून, आपण कुणाला आव्हान देतोय? हे पाहावं, असंही संजय गायकवाड यावेळी बोलताना म्हणाले. पुढे ते म्हणाले, “राज्यातील प्रश्न सोडवण्याचं, राज्याला सिंचन प्रकल्प देण्याचं, अशी आव्हानं एकनाथ शिंदेंनी स्वीकारली आहेत. ते अशा कुठल्याही टीकेला कामातून उत्तर देतात.” दरम्यान, शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी देखील आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

नरेश म्हस्के यांची जहरी टीका –

“मी लायकी म्हणणार नाही, पण योग्यता आणि पात्रता नसलेल्या तरीही कॅबिनेट मंत्री झालेल्या व्यक्तीने आपली उंची आणि वय याचं भान ठेवलं पाहिजे”, असं म्हणत नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी आदित्य ठाकरे यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. “त्यांचा जन्मही झाला नव्हता तेव्हापासून एकनाथ शिंदे यांनी स्वत:ला शिवसेनेच्या कामात वाहून घेतलं आहे. त्यांच्यामागे शिवसनेनेला पाठिंबा देणारे ४० आणि सरकारला पाठिंबा देणारे १० आमदार आहेत. शिवाय १३ खासदार आणि लाखो शिवसैनिक आणि नगरसेवक त्यांच्या पाठिशी आहेत”, असंही ते यावेळी बोलताना म्हणाले.

आदित्य ठाकरे काय म्हणाले?

“मी आमदारकीचा राजीनामा देतो, तुम्हीही राजीनामा द्या आणि माझ्याविरोधात वरळीतून निवडून येऊन दाखवा. तुम्ही कितीही खोके वाटले तरी इथला एकही शिवसैनिक विकला जाणार नाही”, असं आव्हान आदित्य ठाकरे यांनी दिलं.

महत्वाच्या बातम्या :