Sanjay Kakade | एकनाथ शिंदेंना डच्चू? अजित पवार होऊ शकतात मुख्यमंत्री – संजय काकडे

Sanjay Kakade | टीम महाराष्ट्र देशा: अजित पवार (Ajit Pawar) शरद पवारांना सोडून शिंदे-भाजप सरकारमध्ये सामील झाले आहे. अजित पवार यांच्या बंडखोरीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन गट पडले. अजित पवार मुख्यमंत्री पदासाठी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या चर्चा सुरू असताना संजय काकडे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. अजित पवार मुख्यमंत्री होतील, असं त्यांनी म्हटलं आहे.

Ajit Pawar wants to become Chief Minister – Sanjay Kakade

अजित पवार यांना भाजपनं मुख्यमंत्रीपद देण्याचा शब्द दिला असल्याचं माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) म्हणाले आहे. पृथ्वीराज चव्हाण यांच्या या वक्तव्यावर भाजपचे माजी खासदार संजय काकडे (Sanjay Kakade) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय काकडे म्हणाले, “अजित पवार यांना मुख्यमंत्री पदावर विराजमान होण्याची इच्छा आहे. त्यांची ही इच्छा कोणापासूनही लपलेली नाही. अजित पवारांना मुख्यमंत्री व्हायचं आहे, हे जगजाहीर आहे. त्यामुळे अजित पवारांची पक्षातील वरिष्ठ नेत्यांशी काही चर्चा झाली असेल तर ते मुख्यमंत्री होतील.”

पुढे बोलताना ते (Sanjay Kakade) म्हणाले, “नितीश कुमार यांचे निवडून आलेले नेते कमी होते तरी आम्ही त्यांना बिहारचं मुख्यमंत्री पद दिलं. कारण लोकसभेमध्ये त्यांनी चांगलं सहकार्य केलं होतं, म्हणून त्यांना या पदावर विराजमान करण्यात आलं. त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांच्याकडेही कमी आमदार असताना त्यांना मुख्यमंत्रीपद देण्यात आलं. त्यामुळे भाजपचे वरिष्ठ नेते आणि अजित पवार यांच्यामध्ये काही ठरलं असेल तर अजित पवार नक्की मुख्यमंत्री होतील.”

दरम्यान, संजय काकडे (Sanjay Kakade) यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. आधीच सत्तेत अजित पवार गट सामील झाल्यानं भाजप-शिंदे गटातील काही आमदार नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या. त्यानंतर आता संजय काकडे यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळातून काय प्रतिक्रिया येतील? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://bit.ly/46JBgCC