Pune : … म्हणून पंतप्रधानाच्या कार्यक्रमाला गेलो नाही- संजय काकडे

यांच्या पुण्यातील कार्यक्रमाला मला निमंत्रण देण्यात आले नाही. म्हणून मी कार्यक्रमाला गेलो नाही, अशी भूमिका खासदार यांनी मांडली. ते आज पुण्यात वाडेश्वर कट्टयावर बोलत होते.

पुण्याचा भावी खासदार कोण या विषयावर आज वाडेश्वर कट्यावर चर्चा भरवण्यात आली होती. यावेळी बोलताना काकडे म्हणाले की, मी आजवर तब्बल भाजपचे जवळपास दीड लाख सभासद बनवले आहेत, माझे मेरिट पाहता पक्ष मला संधी देईल. मी भाजपकडून पुण्याची जागा लढणार आहे. जनतेमधून संसदेत जाणार असल्याचे ते म्हणाले. यावेळी अंकुश काकडे, , बाबू वागसकर उपस्थित होते.

वेगवेगळ्या कारणांनी कायम चर्चेत राहणारे भाजपाचे सहयोगी खासदार संजय काकडे 2019 मध्ये पुणे लोकसभा लढण्यासाठी इच्छुक आहेत. कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवायचीच असा निर्धार केलेल्या काकडेंना भाजपकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे त्यांनी देखील उमेदवारीसाठी इतर पक्षातून चाचपणी सुरू केल्याची चर्चा आहे. दरम्यान, दस्तुरखुद्द पंतप्रधानांचा कार्यक्रम असतानाही काकडे गैरहजर राहिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.

महत्वाच्या बातम्या –

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.