संजय काकडे भाजपसोबतच, मुख्यमंत्र्यांची माहिती

गेली अनेक दिवसांपासून, पुण्यातील भाजपच्या नेत्यांवर नाराज असलेले संजय काकडे हे भाजप सोबतच असणार असल्याची माहिती खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. गेली अनेक दिवस संजय काकडे काँग्रेसमध्ये जाणार अशी चर्चा सुरू होती. स्वतः काकडे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करत पुण्यातून निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले होते. मात्र आता मुख्यमंत्र्यांना त्यांचे मन वळवण्यात यश आल्याचे दिसते.

आज मुंबईत काँग्रेसचे प्रविण छेडा आणि राष्ट्रवादीच्या भारती पवार यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी संजय काकडेही उपस्थित होते. यावेळी संजय काकडे देखील भाजप सोबत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

Loading...

महत्त्वाच्या बातम्या –

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.