Sanjay Rathod – राज्यात जिल्हानिहाय दूध तपासणी प्रयोगशाळा उभारणार – संजय राठोड
Sanjay Rathod – मुंबई, दि. 9 : राज्यात दुधात होणारी भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत नियमित कार्यवाही केली जाते. येत्या काळात दुधातील भेसळ रोखण्यासाठी विभागांमार्फत विविध मोहिमा राबवण्यात येणार आहेत. राज्यात जिल्ह्यानिहाय दूध तपासणी प्रयोगशाळा उभारणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod ) यांनी विधानसभेत दिली. विधानसभा सदस्य अतुल भातखळकर यांनी कांदिवली येथून भेसळयुक्त दूध साठा जप्त केल्याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता.
मंत्री राठोड म्हणाले की, मुंबई शहरामध्ये येणारे दूध मानकाप्रमाणे आहे किंवा नाही हे तपासण्यासाठी नाका मोहीम राबवण्यात येते. या मोहिमेत दुधाची चाचणी त्याच ठिकाणी करून दूध कमी दर्जाचे आढळल्यास त्याची कायदेशीररित्या विल्हेवाट केली जाते. या विभागातील रिक्त पदे येत्या तीन महिन्यात भरण्याची कार्यवाही करण्यात येईल, तसेच दुधातील भेसळ तपासण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. याबाबतची लवकरच एसओपी तयार करण्यात येईल. दुग्धविकास मंत्री यांच्या समवेत लवकरच याबाबत बैठक घेण्यात येईल असेही मंत्री राठोड ( Sanjay Rathod )यांनी यावेळी सांगितले.
यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री रवींद्र वायकर, हरिभाऊ बागडे, राम कदम, राम सातपुते, जयकुमार रावल, देवयानी फरांदे, पृथ्वीराज चव्हाण यांनी सहभाग घेतला.
- Dry Cough | कोरड्या खोकल्याच्या समस्येपासून त्रस्त असाल, तर करा ‘हे’ घरगुती उपाय
- Sanjay Raut | “…म्हणून राष्ट्रवादीने भाजपसोबत”; नागालँडमधील भाजप पाठिंब्यावर राऊतांची प्रतिक्रिया
- Job Opportunity | महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीमध्ये ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू
- Job Opportunity | मुंबई उच्च न्यायालयामध्ये ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना प्रसिद्ध
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.