Sanjay raut | “…अन्यथा भारताचा पाकिस्तान झाला असता”, संजय राऊतांचा हल्लाबोल

Sanjay raut | मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सध्या राज्यात चालेल्या जवाहरलाल पंडित नेहरु प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत राहुल गांधी यांनी वादग्रस्त केल्यानंतर याला उत्तर देत असताना सावरकर यांचे नातू रणजीत सावरकर (Ranjeet Savarkar) यांनी नेहरुंबाबत विधान केलं होतं. त्यामुळे आता देशाच्या पहिल्याच पंतप्रधानाबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

यावेळी, जवाहरलाल नेहरू यांनी देशाच्या प्रगतीसाठी काम केलं असून स्वातंत्र्यलढ्यात त्यांचा मोठा वाटा आहे. त्यांनी कायम देशाच्या विकासाचा ध्यास घेतला, स्वातंत्र्यावीर सावरकर विज्ञाननिष्ठ होते, त्या दिशेला देशाला घेऊन जाण्याचं काम नेहरूंनी केलं, त्यांनी ते काम केलं नसतं तर या देशाचाही पाकिस्तान व्हायला वेळ लागला नसता, असं संजय राऊत म्हणाले.

सावरकर आणि नेहरू यांनी देशासाठी अमुल्य योगदान दिलं आहे, या दोघांचं कार्य मोठं आहे, पण या दोघांवर सध्या टीका होतेय, हे होता कामा नये. दोघांभोवतीचं राजकारण थांबायला पाहिजे, असं सल्ला देखील राऊतांनी दिला आहे.

गेल्या आठ वर्षांपासून केंद्रात भाजपचे सरकार आहे, पण वीर सावरकरांना ‘भारतरत्न’ देण्याची मागणी शिवसेना करीत असताना हे लोक बहिऱ्याची भूमिका वठवतात . यास ढोंग नाही म्हणायचे तर काय ? वीर सावरकरांचा सन्मान होईल असे एकही काम फडणवीस – मोदी यांनी केले नाही, असंच आजच्या सामना आग्रलेखात म्हटलं होतं.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.