Sanjay Raut | “असे अनेक व्हिडिओ व्हायरल होतात”; संजय राऊतांचं शीतल म्हात्रे व्हिडिओ प्रकरणावर भाष्य

Sanjay Raut | दिल्ली : राजकारणात एखाद्या चित्रपटासारखे ट्विस्ट घडतच असतात. त्यावर संपूर्ण चित्रपटाचं नाट्य सुरू असतं. सद्या महाराष्ट्राच्या राजकारणात देखील असेच एक नाट्य सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी शीतल म्हात्रे व्हिडिओ प्रकरणामुळे महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापलं आहे. यामुळे या राजकारणाला वेगळं वळण लागलं. अशातच या प्रकरणाला धरून राजकीय नेते वक्तव्य करत आहेत. ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी देखील या प्रकरणाबाबत वक्तव्य केलं आहे.

काय म्हणाले संजय राऊत? (What Did Say Sanjay Raut?)

महाराष्ट्राच्या राजकारणात सद्या शीतल म्हात्रे व्हिडिओ प्रकरण सुरू आहे. यावरच आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया केली आहे. “मी सद्या दिल्लीत आहे. नेमकं प्रकरण काय आहे हे अजून माहीत नाही. पण तरुणांना अटक केलं जात आहे. हे अत्यंत चुकीचं आहे. कायद्याचा गैरवापर केला आहे. हा व्हिडिओ खरा आहे की, खोटा हे तपासलं पाहिजे”, असे संजय राऊत म्हणाले.

आमदार सुर्वे शांत का? (Why is MLA Always Quite?)

“आमदार प्रकाश सुर्वे हे शांत का आहेत? कारण सर्व प्रकरणात यांची देखील बदनामी झाली. बदनामी फक्त महिलांची होते असं नाही. ते नेमके कुठे आहे? असे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. लोकांपर्यंत पोहचत असतात. मग सर्वांवर सरकार कारवाई करणार का? त्यांच्यासाठी एसआयटी स्थापन करणार का?”, असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.

“महिलांचा सन्मान राखला गेलाच पाहिजे” (“Women Should Be Respected”)

“कोणत्याही महिलेची बदनामी होऊ नये. त्यांचा आदर राखावा या मताचा मी आहे. सरकार कोणाचं असो महिलांचा सन्मान राखला पाहिजे. पण काही गोष्टींचा सूड घेण्यासाठी चाललं असेल तर त्याला राजकीय कृतीतून उत्तर दिलं जाईल”, असे राऊत दिल्लीतील पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

“व्हायरल झालेला व्हिडिओ खरा की खोटा हे तपसावं”- संजय राऊत

महत्वाच्या बातम्या

You might also like

Comments are closed.