Sanjay Raut | आज फसवणुकीची जयंती तर पुढच्या वर्षी फसवणुकीची पुण्यतिथी; संजय राऊतांनी शिंदे गटाला धरले धारेवर

Sanjay Raut | मुंबई: शिंदे-फडणवीस (Shinde-Fadnavis) सरकार स्थापन होऊन एक वर्ष झालं आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर टीकास्त्र चालवलं आहे. शिंदे-फडणवीस सरकारकडं आम्ही सरकार म्हणून बघतच नाही, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे.

We do not look at the Shinde-Fadnavis government as a government – Sanjay Raut

संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, “या सरकारला नाही, तर महाराष्ट्राच्या फसवणुकीला एक वर्ष झालं आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी जी शिवसेना स्थापन केली, त्या शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसायला एक वर्ष झालं आहे. विश्वासघाताला एक वर्ष पूर्ण झालं आहे. फसवणूक करून महाराष्ट्रात एक घटनाबाह्य सरकार स्थापन करण्यात आलं आहे. शिंदे-फडणवीस सरकारकडं आम्ही सरकार म्हणून बघतच नाही.”

पुढे बोलताना ते (Sanjay Raut) म्हणाले, “यावर्षी फसवणुकीची जयंती आहे. पुढच्या वर्षी फसवणुकीची पुण्यतिथी साजरी केली जाईल. शिंदे गटाचे नेते दिल्लीत फसवणुकीचं सेलिब्रेशन करायला बसले असतील. राज्य सरकारनं मंत्रिमंडळ विस्तार करण्याची हिम्मत दाखवली तर शिंदे गटातील चार मंत्री घरी जातील.”

“राज्यामध्ये कायदा सुव्यवस्थेपासून ते बेरोजगारी, महागाईपर्यंत अनेक प्रश्न आहे. काल शरद पवार (Sharad Pawar) यांनी गायब होणाऱ्या महिलांबाबत दिलेली आकडेवारी खरी आहे. राज्यातून महिलांचं गायब होण्याचं प्रमाण वाढलं आहे. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) इतर सर्व वायफळ विषयावर चर्चा करतात. मात्र गृहमंत्री म्हणून ते अत्यंत अयशस्वी ठरले आहे”, असही ते (Sanjay Raut) यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://bit.ly/434CxBk