Sanjay Raut | “इतके घाणेरडी, दळभद्री मनोवृत्तीचे आमचे सहकारी होते”; राऊतांची शिंदे गटावर आगपाखड
Sanjay Raut | नाशिक : मुंबईमध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेत राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालं आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शिंदे गटाने शिवसेनेच्या विधीमंडळ कार्यलयातून ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे फोटो हटवले आहेत. उद्धव ठाकरेंचे फोटो हटवल्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. नाशिकमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना राऊतांनी शिंदे गटावर चांगलीच आगपाखड केली आहे.
“इतके घाणेरडी, दळभद्री मनोवृत्तीचे आमचे सहकारी होते”
“शिंदे गटाचं संबंधित कृत्य हा शूद्रपणा आहे, तो हलकटपणा आहे. इतके घाणेरडी आणि दळभद्री मनोवृत्तीची लोक आमचे सहकारी होते, याचीही आम्हाला आता लाजू वाटू लागली आहे. विधीमंडळातील पक्षाच्या कार्यालयातून उद्धव ठाकरेंचे फोटो काढले असले तरी जनतेच्या हृदयात ठाकरे परिवाराला जे स्थान आहे, ते कसं दूर करणार? हा शूद्रपणा आहे. हा हलकटपणा आहे.” अशी तिखट प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिली आहे.
“याची किंमत मोजावी लागेल” (Sanjay raut Aggressive on Shinde Group)
“तुम्ही आयुष्यभर ज्यांचं मीठ खाल्लं, ज्यांनी तुम्हाला आयुष्यात मान-सन्मान आणि प्रतिष्ठा प्राप्त करून दिला. अगदी बाळासाहेब ठाकरेंपासून उद्धव ठाकरेंपर्यंत ज्यांनी तुम्हाला विविध पदावर नेमलं, म्हणून तुम्ही आज गद्दारीची क्रांती करू शकलात. तुम्ही त्यांचे फोटो काढता याची किंमत तुम्हाला मोजावी लागेल. इतके घाणेरडे आणि दळभद्री मनोवृत्तीचे लोक आमचे सहकारी म्हणून वावरत होते, याची आता आम्हाला लाज वाटू लागली आहे,” असंही संजय राऊत म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
- Girish Mahajan | “मला फसवण्याचा कट, माझ्या गाडीत गांजा”; महाजनांनी सांगितलं ‘ते’ पेनड्राईव्ह प्रकरण
- Chinchwad | ‘चिंचवड’ची जागा भाजपच राखण्याची शक्यता; ‘रिंगसाईड रिसर्च’चा अंदाज
- Chandrakant Khaire | “ईव्हीएम मशीन सॅटेलाइटद्वारे नियंत्रित केल्या जातात म्हणूनच..”; चंद्रकांत खैरेंचा गोप्यस्फोट
- Saroj Ahire | “त्यांचं ‘हिरकणी कक्ष’ त्यांनाच लखलाभ”; विधीमंडळात मोठ्या हुरुपाने आलेल्या आमदार नाराज होऊन बाहेर
- Ravindra Dhangekar | “मुख्यमंत्री शिंदेंनी ज्या घरात पैसे वाटले ते घर माझच होतं”; धंगेकरांचा गंभीर आरोप
Comments are closed.