Sanjay Raut | “कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचं विधान स्क्रिप्टेड, यामागे मोठं षडयंत्र”, संजय राऊतांचा भाजपवर गंभीर आरोप

Sanjay Raut | मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavraj Bommai) यांना थेट धमकी दिली होती. महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील 40 गावांवर कर्नाटक सरकारने दावा केला आहे. यामागे भाजप (BJP) पक्षाचं षडयंत्र असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे.

यावेळी, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्रावर अचानक हल्ला केला. मी त्याला हल्ला म्हणतो, युद्ध म्हणतो, यामागे फार मोठं कारस्थान आणि षडयंत्र आहे, महाराष्ट्रात भाजपच्या नेत्यांकडून महाराजांचा अपमान झाला आहे, असं संजय राऊत म्हणाले.

यादरम्यान, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजप नेते सुधांशु त्रिवेदी यांनी महाराजांवर चिखलफेक केली, त्यामुळे महाराष्ट्रात संतापाची लाट आहे, सरकार विरोधात संताप आहे, त्यावरचं लक्ष विचलीत व्हावं म्हणूनच बोम्मईंना पुढे केलं असल्याचा दावा देखील राऊतांनी केला आहे.

दरम्यान, आम्ही हा अपमान विसरणार नाही, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या बोलण्यावर विश्वास नाही. हे खोके सरकार आहे. यांना खोके दिले तर हे लोक गप्प बसतील. महाराष्ट्राला विसरतील. पण शिवसेना विसरणार नाही, हे सर्व स्क्रिप्टेड आहे. नाही तर भाजपचा मुख्यमंत्री दुसऱ्या भाजपच्या मुख्यमंत्र्यांवर टीका कशाला करेल? देशभरात असं कधी पाहिलंय का? योगींनी गुजरातच्या मुख्यमंत्र्यावर टीका केली. गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यावर टीका केली असं कधीच होत नाही, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.