Sanjay Raut | “कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांना इशारा नाही, तर धमकी देतो…”, संजय राऊतांचा सज्जड दम

Sanjay Raut | मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavraj Bommai) यांना थेट धमकी दिली आहे. महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील 40 गावांवर कर्नाटक सरकारने दावा केला आहे. यावरुन राजकारण तापलं असून याच पार्श्वभूमीवर राऊतांनी धमकी दिली आहे.

यावेळी, मी कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांना इशारा देत नाही, धमकी देतो, तुमची बकबक बंद करा, हे घेऊ, ते घेऊ हे थांबवा, आजही आम्ही शांत आणि संयमी आहोत, आमचं सरकार जरी सिलिंडरवर करून गुडघ्यावर बसलं असलं तरी

शिवसेना स्वाभिमानाने उभी आहे या महाराष्ट्रात हे विसरू नका, असा घणाघात संजय राऊत यांनी केला आहे.
आता कुठे आहे तुमचा स्वाभिमान? कुठं शेण खातोय तुमचा स्वाभिमान? कुठं पेंड खातोय तुमचा स्वाभिमान? एक मुख्यमंत्री गाव घेत आहे. एक उद्योग घेतो आहे अन् षंडासारखे बसला आहात तुम्ही?, असे खोचक सवाल राऊतांनी शिंदे गटातील आमदारांना केला आहे.

महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील 40 गावांवर कर्नाटक सरकारने दावा केला आहे. 40 गावांच्या ठरावाचा महाराष्ट्राने गांभीर्याने विचार करावा असेही बोम्मई यांनी म्हटले आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांनी सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील 40 गावे पाण्याच्या प्रश्नावर कर्नाटकात सामील होऊ इच्छित असल्याचा खुलासा केला होता. त्यानंतर आता त्यांनी हे मोठे वक्तव्य केले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील जत तालुक्यांकडे कर्नाटकची नजर असल्याचे स्पष्ट झाले आहे.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.