Sanjay Raut | कर्नाटक मतदानाच्या पार्श्वभूमीवर संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोप ; म्हणाले…

Karnataka Assembly Election 2023 | मुंबई : गेल्या एक महिन्यापासून कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या ( Karnataka Assembly Election ) पार्श्वभूमीवर जोरदार तयारी पाहायला मिळाली. भाजपने (BJP) चांगलीच कंबर कसली होती. प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi ), अमित शहा (Amit Shah), देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis), आणि एकथान शिंदे ( Eknath Shinde) देखील मैदानात उतरले होते. तर आज ( 10 मे) मतदान होणार आहे. यामुळे संपूर्ण देशाचं लक्ष आता निवडणुकीच्या निकालाकडे लागलं आहे. यातच आता खासदार संजय राऊत ( Sanjay Raut) यांनी ट्विट करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर आरोप करत टीका केली आहे.

काय म्हणाले संजय राऊत ( What did Sanjay Raut say)

ट्विट करता संजय राऊत ( Sanjay Raut) यांनी म्हटलं आहे की, “आज कर्नाटक राज्यात विधान सभा निवडणुकिसाठीच मतदान पार पडत आहे. पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शहा यांनी घाम आणि पैसा गाळला तरीही भाजपचा पराभव निश्चित आहे. यामुळे आगामी 2024 च्या निवडणुकीसाठी हा प्रभाव शुभ शकुन आहे”, असं संजय राऊतांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे. तसचं पुढे त्यांनी एकनाथ शिंदेंवर देखील आरोप करत म्हटलं की, “दुःख इतकेच आहे की, महाराष्ट्राचे सध्याचे मिंधे राज्यकर्ते यांनी आपल्या सीमा भागात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पराभवासाठी कारस्थाने केली. स्वतःला शिवसेना म्हणून घेणाऱ्या मुख्यमंत्री साहेबांनी मंगलोर मार्गे काही खोके बेळगावात पाठवून एकीकरण समितीच्या उमेदवारांचा पराभव करण्यासाठी शर्थ केली. महाराष्ट्राशी ही गद्दारीच आहे..मराठी माणूस हे लक्ष्यात ठेवील. जय महाराष्ट्र!” असा आरोप करत ट्विट केलं आहे.

दरम्यान, ही कर्नाटक विधानसभा निवडणूक बेळगावातील सीमाभागातील मराठी भाषिक लोकांसाठी महत्वाची आहे. कारण अनेक वर्षांपासून चालू असलेला हा वाद अजूनही मिटलेला नाही यामुळे या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांना पाठिंबा दिला. ठाकरे गटाचे संजय राऊत, काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बेळगावात मराठी माणसासाठी प्रचार केलेला पाहायला मिळालं आहे. तर आज कर्नाटकातील २२४ मतदारसंघासाठी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. महाराष्ट्राच्या सीमेला असणाऱ्या बेळगावातही १८ मतदारसंघासाठी आज मतदान होणार आहे. यामुळे सर्वच पक्षांनी या निवडणुकीसाठी पूर्ण ताकद देखील लावली होती. यामुळे सर्वांचं लक्ष आता निवडणुकीच्या निकालाकडे लागलं आहे.

महत्वाच्या बातम्या-