Sanjay Raut | “कायदा तुमच्या घरात नाचायला ठेवला आहे का?”; राऊतांचा श्रीकांत शिंदेंना सवाल

Sanjay Raut | मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. श्रीकांत शिंदे यांनी ठाण्यातील एका गुंडाला माझ्यावर हल्ला करण्याची सुपारी दिली, असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला होता. या आरोपाला प्रत्युत्तर देताना संजय राऊतांना उपचाराची गरज आहे, अशी टीका श्रीकांत शिंदे यांनी केली होती. दरम्यान, या टीकेला आता संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

“शिंदेंनी एवढं अस्वस्थ होण्याचं कारण नाही”

“श्रीकांत शिंदे हे हाडाचे डॉक्टर आहेत आणि त्यांनी बरेच वर्ष प्रॅक्टिस केलेली नाही, एवढं मला माहिती आहे. जी माहिती मला मिळाली होती. ती मी पोलिसांनी दिली. श्रीकांत शिंदेंनी एवढं अस्वस्थ होण्याचं कारण नाही. शिंदे गटाकडून माझ्याविरोधात जे मोर्चे निघत आहेत. हे कायद्याचं राज्य असल्याचं लक्षण नाही”, असे संजय राऊत म्हणाले आहेत.

“कायदा तुमच्या घरात नाचायला ठेवला आहे का? (Sanjay Raut criticize Shrikant Shinde)

“एखादा व्यक्ती जर तक्रार करत असेल, तर त्याची चौकशी व्हायला पाहिजे. तक्रार केली म्हणून दहशतवाद होता कामा नये. कायदा तुमच्या घरात नाचायला ठेवला आहे का? एका गुंडाच्या समर्थनासाठी एक पक्ष रस्त्यावर उतरतो आहे, ही महाराष्ट्राची संस्कृती बदलण्याचा प्रयत्न आहे”, असं प्रत्युत्तर संजय राऊत यांनी दिलं आहे.

“हे सुपारी बाजांचं राज्य आहे का?”- Sanjay Raut

“हे सुपारी बाजांचं राज्य आहे का? जे तुमच्या विरोधात बोलतात त्यांना तुम्ही अशा प्रकारे संपवणार आहात का? असा प्रश्न ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. आपल्यावर हल्ला करण्यासाठी ठाण्यातील गुंड राजा ठाकूर (Raja Thakur)  याला खासदार श्रीकांत शिंदे यांनी सुपारी दिल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या

You might also like

Comments are closed.