Sanjay Raut | काल ठाण्यात दोन हास्यजत्रेचे शो पाहायला मिळाले; शिंदे-फडणवीसांच्या बैठकीवर संजय राऊतांची प्रतिक्रिया

Sanjay Raut | मुंबई: काल रात्री उशिरा एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या ठाण्यातील निवासस्थानी शिंदे गटाची बैठक सुरू होती. ही बैठक सुरू असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) शिंदेंच्या निवासस्थानी दाखल झाले.

रात्री इतक्या उशिरा फडणवीस मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी आल्यामुळं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Devendra Fadnavis makes a false statement in a state of frustration – Sanjay Raut

संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, “काल ठाण्यात दोन हास्यजत्रेचे शो पाहायला मिळाले. कुठे फु बाई फु, तर  कुठे हास्यजत्रा तर कुठे हवा येऊ द्या. ठाणे जिल्ह्यात काल आजूबाजूला दोन शो पार पडले.

देवेंद्र फडणवीस म्हणतात आम्ही राष्ट्रवादी बरोबर गेलो ही कूटनीती आहे. मग आम्ही जेव्हा राष्ट्रवादीसोबत गेलो तेव्हा ते काय होतं? यांचं उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला द्यावं. देवेंद्र फडणवीस वैफल्यग्रस्त अवस्थेमध्ये चुकीचं विधान करतात.”

पुढे बोलताना ते (Sanjay Raut) म्हणाले, “दुसऱ्या फु बाई फुच्या कार्यक्रमात ठाण्यामध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या समर्थकांना समजावण्याचा प्रयत्न केला, असं आम्ही ऐकलं. राष्ट्रवादीसोबत आपण गेलो हे बेरजेचे राजकारण आहे.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पुन्हा एकदा सिद्ध केलं की ते किती खोटे आहे. त्यांना कोणी कोणती भांग पाजली आहे, हेच कळत नाही. फडणवीस खोटं बोलत आहे, शिंदे खोटे बोलत आहे.”

“आम्ही करतो ती कूटनीती आणि शिवसेनेने केला तो विश्वासघात. मात्र प्रत्यक्षात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी केलेला विश्वासघात महाराष्ट्राच्या जनतेच्या हृदयात आरपार घुसला आहे. त्यामुळं तुम्हाला जनता कुटून खाणार आहे”, असही ते (Sanjay Raut) यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://bit.ly/3Dbff2f