Sanjay Raut | काही लोक स्वतःहून गुलामी पत्करतात; संजय राऊतांचा अजित पवारांवर घणाघात

Sanjay Raut | मुंबई: राष्ट्रवादीत बंडखोरी करत अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह काही आमदार राज्य सरकारमध्ये सामील झाले आहे. त्यानंतर अजित पवारांनी उपमुख्यमंत्री तर त्यांच्यासोबत आलेल्या 09 मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. या घटनेनंतर महाविकास आघाडीमध्ये मोठी फूट पडली. यावरूनच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अजित पवारांवर घणाघाती टीका केली आहे.

Some people (Ajit Pawar) like slavery – Sanjay Raut

महाविकास आघाडीमध्ये अजित पवारांचा एक वेगळा रुबाब होता तेच स्थान त्यांना या सरकारमध्ये मिळणार का? या प्रश्नाचं उत्तर देत संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, “काही लोकांना (अजित पवार) गुलामी आवडते.

त्याचबरोबर गुलामाला गुलाम असल्याची जाणीव करून देणे गरजेचं असतं. मात्र काही लोक स्वतःहून गुलामी पत्करतात. आपल्या गळ्यात गुलामीचा पट्टा घालून घेतात. त्यामुळे या गोष्टीला नाईलाज आहे.”

पुढे बोलताना ते (Sanjay Raut) म्हणाले, “आमच्या लोकांनी आणि राष्ट्रवादीच्या लोकांनी काही विशिष्ट कारणांमुळे पक्ष सोडला आहे. राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांचे साखर कारखाने आहेत, बँका आहेत, सूतगिरणी आहेत, त्याचबरोबर त्यांचे काही घोटाळे आहेत. या सर्व घोटाळ्यातून मुक्त होण्यासाठी ते राज्य सरकारमध्ये सामील झाले आहे.”

“महाराष्ट्राची लीडरशिप दिल्लीमध्ये कधीपासून गेली? काँग्रेस सत्तेत असताना दिल्ली हाय कमांड आदेश द्यायचं, तेव्हा सत्ताधारी त्यांच्यावर टीका करायचे. मात्र, आज ते देखील तेच करत आहे.

खातेवाटप, निधी वाटप, मंत्रिमंडळ विस्तार हे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकार दिल्लीत जात आहे. ही गोष्ट सत्ताधारी अभिमानानं स्वीकारत आहेत”, असही ते (Sanjay Raut) यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://bit.ly/3NTwgmm