Sanjay Raut | “कुठे शेण खातोय तुमचा स्वाभिमान?”; सीमाप्रश्नावरून संजय राऊतांचा शिंदे सरकारला खोचक सवाल

Sanjay Raut | मुंबई : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरून (Maharashtra-Karnataka Borderism) सध्या राज्यातील राजकारण तापलेलं आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीनंतर महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आलं. या घटनेला आता सात दशकांहून जास्त काळ उलटला. मात्र, कर्नाटकसोबत असलेला सीमाप्रश्न अजूनही सुटलेला नाही. सीमाभागातील अनेक गावांना महाराष्ट्रात सामील होण्याची इच्छा असल्याचा दावा सातत्याने महाराष्ट्राकडून केला जात आहे. बेळगावमध्ये यावरून मोठा संघर्ष पाहायला मिळाला आहे.  त्यात आता सांगलीतील जत तालुक्यातल्या ४० गावांवरही दावा करण्याची तयारी बोम्मई सरकारने केल्याचं समोर आलं आहे. या पार्श्वभूमीवर संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिंदे सरकारवर हल्लाबोल चढवला आहे.

“कुठे गेलाय तुमचा स्वाभिमान? कुठे शेण खातोय तुमचा स्वाभिमान?”, असे सवाल संजय राऊत यांनी राज्य सरकारला केले आहेत. “बाजूच्या राज्यातला एक मुख्यमंत्री आमची गावं खेचून घेण्याचा प्रयत्न करतोय, एक राज्य आमचे उद्योग खेचून घेण्याचा प्रयत्न करत आहे. षंढासारखे बसलात तुम्ही”, अशा शब्दात राऊतांनी सरकारवर टीकास्त्र सोडलेत.

ते म्हणाले, “यावर ठाम भूमिका घेऊन आमच्या राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री उभे राहात नाहीत. ‘फक्त हे शक्य नाही, एकही गाव जाणार नाही’ असं बोलून चालत नाही. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या वर्मावर घाव घातला आहे. महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांना लाज वाटली पाहिजे. आत्तापर्यंत कोणत्याही कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची अशी हिंमत झाली नव्हती. ते मुख्यमंत्री भाजपाचे आहेत आणि तुम्हीही भाजपाचे राज्यकर्ते आहात हे लक्षात घ्या.”

“आतून काही संगनमत चाललंय का?”, असा खोचला सवालही त्यांनी यावेळी बोलताना केलाय. “गुजरातनं महाराष्ट्राचे उद्योग पळवायचे आणि कर्नाटकने महाराष्ट्राची गावं, तालुके पळवायचे आणि हा महाराष्ट्र नकाशातून खतम करायचा, दुसऱ्या बाजूला भाजपाचे लोक शिवाजी महाराजांवर हल्ले करत राहून आमचं मनोधैर्य खच्ची करायचं अशा प्रकारचं षडयंत्र पडद्यामागे रचलं जातंय का अशी भीती वाटतेय”, अशा शब्दांत संजय राऊतांनी संताप व्यक्त केला आहे.
महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.